एकनाथ शिंदेच बंड यशाच्या वाटेवर? ४ आमदारांना घेऊन आशिष जैस्वाल गुवाहाटीत दाखल

Update: 2022-06-23 06:44 GMT

 गेली २ दिवस महाराष्ट्रात जी खळबळ माजली आहे यामद्ये आणखीनच वाढ होताना दिसत आहे . मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह नंतर समाजमाध्यमांतून उद्धव ठाकरेंना जरी सहानभूती मिळाली असली तरी एकनाथ शिंदेंना जाऊन मिळणाऱ्या आमदारांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे आमदार तसेच खासदार यांची रीघ वाढू लागली आहे. कालपर्यंत मुंबईत असणारे आमदार आज गुवाहाटीत दाखल झाले आहेत . शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर ,संजय राठोड, दादा भुसे, दीपक केसरकर ,सदा सरवणकर आता गुवाहाटीला पोहचले आहेत. यांचं स्वागत स्वतः एकनाथ शिंदे यांनी हॉटेल बाहेर येत केलं आहे. ४२ शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे मिळून ५० आमदार आता शिंदेच्या गटात सामील होतील .

'मी देखील मूळचा शिवसैनिक आहे ,आमचे शिवसेनेवर प्रेम आहे .आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने का आलो, याचा विचार करणे गरजेचे आहे ',असे जैस्वाल म्हणाले आहेत . एकनाथ शिंदे यांच्या बंडाने सध्या पक्षांतर बंदी कायदा किंवा राष्ट्र्पती राजवट लागू होईल का असे प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहेत . एकीकडे 'मला सत्तेचा मोह नाही ,मला कोणताच मोह माझ्या विचारांशी फारकत घ्यायला लावू शकत नाही',असे म्हणत काल उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडले पण दुसरीकडे निम्म्याहून अधिक आमदार सध्या शिंदे यांच्या तंबूत दाखल झाल्याने आता शिवसेना नेमकी कुणाची ?असा प्रश्न पडत आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच दोन्ही बाजुंनी पत्राचे राजकारण सुरु आहे.अद्याप सत्तानाटकात अजून काय बदल होतील सांगता येत नाही .

Tags:    

Similar News