अटकेची मागणी होताच बच्चू कडू घाबरले...

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर बोलताना प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आसाममध्ये लोक कुत्रे खातात, असे विधान केले होते. यानंतर आसाम विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला.

Update: 2023-03-12 11:59 GMT

बच्चू कडू यांच्या अटकेची मागणीही त्यांनी केली. या वादानंतर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी माफी मागून आपली भूमिका स्पष्ट केली. "नागालँडमधील (Nagaland) लोक कुत्रे खातात," बच्चू कडू म्हणाले आहेत. मला वाटले आसाममधील (Assam) लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळ आहेत. मी चुकून आसाम हे नाव घेतले, ते नागालँड असायला हवे होते. हि माझी चूक आहे. यामुळे राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. बच्चू कडू यांच्या वक्तव्याने आसाम विधानसभेत वातावरण तापले. कडू यांच्या वक्तव्यामुळे आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे राज्यपाल गुलाबचंद कटारिया (Gulab Chand Kataria) यांनाही आपले भाषण थांबवावे लागले.

काँग्रेस (Congress) आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ (Kamalakhya Dey Purkayastha) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. आसामबाबत असे वादग्रस्त विधान केल्यानंतर सरकार यावर गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच हे वक्तव्य करणाऱ्या बच्चू कडू यांना अटक करण्याची मागणी आसाममधील विरोधी पक्षाच्या आमदारांनी केली. अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले होते. महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्व भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये पाठवा. त्यांची तिथे किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्याचे मांस खातात. तिथले लोक कुत्र्याचे मांस खातात जसे आपण बोकड खातो. या कुत्र्यांची खरेदी-विक्री केली जाईल. गुवाहाटीला गेल्यावर आम्हाला याची माहिती मिळाली.

Tags:    

Similar News