महाविकास आघाडीचे मंत्री अस्लम शेख यांना होतं क्रूझ पार्टीचं निमंत्रण...
आर्यन खान आणि इतर लोकांवर ड्रग्स पार्टीसंदर्भात जे आरोप लावण्यात आला आहे. त्या क्रूझ पार्टीसाठी महाविकास आघाडीचे मंत्री अस्लम शेख यांना देखील निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आज नवाब मलिक यांनी दिली आहे. मात्र, एका कार्यक्रमामुळे ते पार्टीला पोहोचू शकले नाहीत. त्यांना निमंत्रण देऊन एक इव्हेंट आहे. असं सांगण्यात आल्याचं समजतंय.
दरम्यान अस्लम शेख यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रने या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून वारंवार संपर्क केला असता, त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी या विषयावर मंत्रीमहोदयाशी चर्चा करुन माहिती देतो. अशी प्रतिक्रिया दिली.. मात्र, या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
त्यामुळे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात जर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याला आमंत्रण होते. तर सदर मंत्र्याने या संदर्भात माध्यमांना माहिती का दिली नाही? इतक्या महत्त्वाच्या केसमध्ये महाराष्ट्राचा एक मंत्री गप्प का बसतो? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्र्याला क्रूझ पार्टी होणार आहे, ड्रग पेडलर Invite करतोय इतकं माहित असूनही महाराष्ट्राचा एक मंत्री ही माहिती गेल्या एक महिन्यांपासून माध्यमांपासून लपवून का ठेवत आहे? कुणाला वाचवण्यासाठी अस्लम शेख एक महिन्यापासून गप्प आहेत? हे काय कनेक्शन आहे? तसंच त्यांना या पार्टीचं आमंत्रण कोणी दिलं होतं? ते पार्टीच्या आयोजकाच्या संपर्कात होते का? असतील तर ते आयोजकाचं नाव माध्यमांना देतील काय?
असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
काय म्हटलंय नवाब मलिक यांनी?
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात फॅशन टीव्हीचा ब्रँड असलेला पेपर रोल जप्त करण्यात आला आहे. त्या रोलमधून अंमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या ब्रँडचा मालक कासफ खान आहे. मालकाला अटक का झाली नाही? ते वानखेडे यांचे भागीदार असून ते पार्टीत उपस्थित होते.
कासम खानने आमचे मंत्री अस्लम शेख यांना पार्टीला येण्यास बळजबरी केली होती. आमच्या सरकारमधील विविध मंत्र्यांच्या मुलांनाही पार्टीला आणण्याचा त्यांचा डाव होता. अस्लम शेख तिथे गेले असते तर उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र झाला असता.
असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.