देशातील तरुणांसाठी काही ठेवाल की नाही? अरविंद सावंत यांचा उद्विग्न सवाल
मुंबई येथील व्हिक्टोरिया स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे. मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला नाही. याकडे अरविंद सावंत यांनी सरकारचे लक्ष वेधले. देशाची संपत्ती असलेली LIC विकली जात आहे. रस्ते विकले जात आहेत. रेल्वे विकली जात आहे. जर सगळंच विकून टाकलं जाणार असेल तर देशातील तरुणांसाठी काही ठेवणार आहात की नाही? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला. देशातील शेतकरी आणि कामगाराकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी केली.