RSS चा अजेंडा पुढे नेतांना अरविंद केजरीवाल
आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रुपयाच्या घसरणीवरून केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.;
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी देशाची अर्थव्यवस्था (indian economy) सुधारण्यासाठी रुपयावर देवी-देवतांचे फोटो मुद्रीत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदूत्ववादी अजेंडा पुढे नेत असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल हे दिल्ली येथे बोलत असताना म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था ही गाळात अडकली आहे. त्यामुळे या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांसोबत देवी-देवतांचा आशिर्वाद आवश्यक आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, रुपयावर एका बाजूला महात्मा गांधी (Mahatma Gandhi) आणि दुसऱ्या बाजूला श्रीगणेशा (Shi ganesha) आणि लक्ष्मी (lakshmi)देवीचा फोटो लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे RSS च्या वाटेने जात असल्याची टीका होत आहे.
देशात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरु असताना केजरीवाल यांनी हनुमान चालीसा पठन केली होती. त्यातच आता गुजरात निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केजरीवाल यांनी हे वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी रुपयावर गणपती आणि लक्ष्मीचा फोटो मुद्रीत करण्याची मागणी केल्यानंतर देशात रुपयावर वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो मुद्रीत करण्याची मागणी वाढत आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो मुद्रीत केल्यानंतर छान दिसेल असे म्हटले आहे. दुसरीकडे राम कदम (Ram kadam) यांनीही छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), वि. दा. सावरकर (V D savarkar) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे असलेले फोटो ट्वीट केले आहेत.
पुर्वीपासूनच RSS चा महात्मा गांधी यांच्या नोटेवरील फोटोला विरोध आहे. त्यापार्श्वभुमीवर अरविंद केजरीवाल यांनी देवी-देवतांचे फोटो नोटेवर छापण्याची मागणी केली आहे. त्यामुळे केजरीवाल RSS चा अजेंडा पुढे नेत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.