विधीमंडळ आधिवेशनाच्या तोंडावर राज्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर अडचणीत आले आहेत. मजूर म्हणुन ते मुंबई जिल्हामध्यवर्ती बॅंकेवर बिनविरोध निवडले असले तरी आता सहकार विभागाने ते मजूर नसल्याचे तक्रार स्विकारुन त्यांना नोटीस बजावली आहे.
प्रविण दरेकर यांनी मुंबई बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थे अंतर्गत अर्ज दाखल केला होता. ते बिनविरोध निवडले आहेत. यापूर्वीही दरेकर मजुर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.आताही त्यांनी प्रतिज्ञा मंजूर संस्थेमार्फत मुंबई बँक निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे.
मात्र दरेकर मजुर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आह. या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे.या नोटिशीत आपण मजूर आहात की नाही अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली आहे. तसेच दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुद करण्यात आले आहे. मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. याबाबत प्रविण दरेकर यांना २१ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणे मांडण्याबाबत नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. आपचे धनंजय शिंदे यांनी चौकशीबद्दल समाधान व्यक्त केले असून हे प्रकरण तडीस जाईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं म्हटलं आहे.