नेतृत्वाचा अहंकारामुळेच भाजपचे नेते बाजूला जात आहेत का?

Update: 2021-08-01 06:53 GMT

मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकीय संन्यास घेतल्यानंतर पश्चिम बंगाल सोबत भारतीय राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शिवसेनेचे उपनेते आणि नगरसेवक यशवंत जाधव यांनी ट्विट करत हा नेतृत्वाचा अहंकार असल्याचे म्हटलं आहे.

यशवंत जाधव यांनी आपल्या ट्विटमध्ये , अडवाणी बाजूला का झाले? नाना पटोलेनी राजीनामा का दिला? यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, शत्रुघ्न सिन्हा का चिडले? शिवसेना का दुरावली? अकाली दल बाहेर का पडले? बाबुल सुप्रियोनी राजीनामा का दिला ? या सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे ..... नेतृत्वाचा अहंकार. असं म्हटलं आहे.



बाबुल सुप्रियो यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेत असल्याबाबत एक फेकबुक पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. सुप्रियो यांचा पश्चिम बंगाल मध्ये पराभव झाल्याने, त्यांना भाजपकडून वेगळी वागणूक दिली गेली असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

तर अनेकांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांसोबत त्यांचे मतभेद असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटलं आहे. मात्र , केंद्रातील नेतृत्वाच्या अहंकारामुळेच हे होत असल्याचे विरोधकांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News