फरार अनिल जयसिंघानी अखेर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात...

अमृता फडणवीस यांना लाच देऊन ब्लॅकमेल करण्याच्या प्रयत्नात अनिल जयसिंघानी या गुजराती बुकी ला ताब्यात घेण्यात आले. अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला कायद्या नुसार यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे.;

Update: 2023-03-20 09:41 GMT

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या अनिल जयसिंघानी आणि त्यांची मुलगी अनिक्षा यांच्या ब्लॅकमेलचे लक्ष्य बनल्या होत्या. अमृताला फडणवीस यांना लाचही देण्यात आली आली होती. त्यांनी ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांना रेकॉर्डिंग आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांची मलबारहिल पोलीस ठाण्यात (Malabar Hill Police Station) तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी उल्हाननगर येथे जाऊन अनिक्षाला ताब्यात घेतले. दरम्यान पोलिसांनी अनिल जयसिंघानीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुजरातमध्ये जाऊन त्याला अटक केली. अटकेनंतर जयसिंघानी याला मुंबईत घेऊन आले आहे. अनिल आणि अनिक्षा यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली.

हे प्रकरण काय आहे?

अनिक्षा जयसिंघानी या फॅशन डिझायनरने एका प्रकरणात मदत करण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय, अमृता फडणवीस यांना 20 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मलबार हिल पोलिस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) धमकावल्याचे कळवले. या तक्रारीवरून अनिक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांची लाच ऑफर केली असा आरोप अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि तिच्या वाडिलांवर म्हणजेच अनिल जयसिंघानी यांच्या वर केला.

अनिल जयसिंघानी कोण आहे ?

अनिल जयसिंघा (Anil Jayasingha) हा एक बुकी आहे. त्याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. अनिल जयसिंघानी हा सात वर्षांपासून बेपत्ता आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि आसामसह प्रत्येक राज्यातून पोलिस त्याचा पाठलाग करत होते. 2015 मध्ये ईडीने त्याच्या घरावर छापा टाकला होता. याशिवाय, त्याच्यावर लोकांविरुद्ध पुरावे तयार करण्याचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा आरोप आहे.

Tags:    

Similar News