उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर अमृता फ़डणवीस यांचा टोला

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-05-16 07:13 GMT
उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर अमृता फ़डणवीस यांचा टोला
  • whatsapp icon

कोरोनानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून उध्दव ठाकरे यांनी निशाणा साधला होता. त्याला अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या मास्टरसभेत बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मी बाबरी पाडायला गेलो होतो, असे वक्तव्य केले होते. त्यावरून उध्दव ठाकरे यांनी बाबरी पाडायला तुम्ही सहलीला गेले होते का? असा सवाल केला. तसेच चला चला चला आयोध्येला चला असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला होता. त्यानंतर या टीकेला अमृता फडणवीस यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

यामध्ये अमृता फडणवीस म्हणाल्या की, वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल 'हल्का' कर दिया, अशी टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणामुळे हलके असलेल्या व्यक्तीला आणखी हलके केले आहे, असा टोला अमृता फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे

शिवसंपर्क अभियानांतर्गत असलेल्या सभेला संबोधित करताना उध्दव ठाकरे म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडायला गेल्याचा दावा केला होता. पण ती काय शाळेची सहल होती का? तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, जर देवेंद्र फडणवीस यांनी पाय जरी ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा कोसळला असता, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरून उध्दव ठाकरे यांनी टीका केली होती.

Tags:    

Similar News