पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होऊ न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. प्रोटोकॉलनुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, मावळचे खासदार या दोघांना निमंत्रित न करणं आणि पालकमंत्री स्टेजवर असताना जाणीवपूर्वक अजित पवारांच्या भाषणाचा प्रोटोकॉल डावलणं हे सुडाचे राजकारण देवेंद्र फडणीस करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. मोदींजीसमोर माझ भाषण झालं तर, आगामी काळात आपण मोदींची जागा घेऊ शकतो, असा संदेश फडणवीस यांना द्यायचा होता, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे.