अमित शहा तुम्ही मला वेळ देत नाहीत- सुधीर मुनगुंटीवार
अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण कार्यक्रम झाला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं.;
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बोलताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमित शहा तुम्ही मला वेळ देत नाहीत, असं वक्तव्य केलं.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, अमित शहा तुम्ही मला वेळ देत नाहीत. त्यामुळे मला बोलताही येत नाही. मात्र तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीरभुमीची सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीरभुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत आहे. एवढंच नाही तर मे च्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहोत. ब्रिटनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनखे आणि जगदंब तलवार आहे. ही तलवार आणि वाघनखे महाराष्ट्राला देण्याबाबत ब्रिटन सरकार सकारात्मक असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.