पार्थ पवार पुन्हा मैदानात, भाजपला इशारा?

Update: 2021-10-14 14:45 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा मैदानाता उतरले आहेत. मात्र यंदाचे मैदान असेल ते पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे...राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली ही महापालिका गेल्यावर्षी भाजपने खेचून घेतली होती. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या तयारीला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढणारे ट्विट्स केले आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात नागरिकांनी तक्रार करण्याचेही आवाहन केले आहे.


पार्थ पवार यांनी गुरूवारी ट्विट करत पुन्हा एकदा महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. "औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवडमधील लघुउज्योदक हे शहराचा अविभाज्य घटक असून, त्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत. समस्या आमच्यापर्यंत पोहोचल्या असून त्याच्या निवारणाची जबाबदारी आम्ही घेत आहोत. #PCMC" असे ट्विट त्यांनी केले आहे.

त्याआधी १३ तारखेलाच पार्थ पवार यांनी ट्विट करत "सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार #हीचकास्मार्ट_सिटी" अशी टीका केली होती.

त्याचबरोबर पार्थ पवार यांनी बुधवारी एक ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात.... "सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।"

आता पार्थ पवार यांचा निशाणा कुणावर आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Tags:    

Similar News