प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीत ठिणगी, अजित पवार यांनी दिला इशारा
उध्दव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांची युती होऊन पाच दिवसही झाले नाहीत. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी इशारा दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thacekray) यांच्या जयंतीनिमीत्त प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा केली. मात्र या घोषणेचा तिसऱ्याच दिवशी प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad pawar) हे भाजपचेच असल्याचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. त्यापाठोपाठ संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. त्यावर कोण आहे संजय राऊत? अशी प्रतिक्रीया देत प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत (sanjay Raut) यांचा सल्ला धुडकावून लावला. त्यापाठोपाठ अजित पवार यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावरून इशारा दिला आहे.
शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर देतांना कोण आहेत संजय राऊत? असं म्हणत राऊत यांचा सल्ला धुडकावून लावला आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देतांना अजित पवार यांनी थेट इशारा दिला आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली आहे. मात्र ही युती टिकवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. त्यामुळे त्यांना अशा प्रकारची वक्तव्ये करता येत असतील तर आम्हालाही अशा प्रकारे बोलता येतं, असा इशारा देतांनाच अजित पवार (Ajit pawar) यांनी प्रकाश आंबेडकर यांना सल्ला दिला आहे.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
जयंत पाटील (Jayant patil) यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार आणि अजित पवार होते. त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार हे भाजपचेच माणूस आहेत.
संजय राऊत काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी आम्ही अजिबात सहमत नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहूजन आघाडीची (Vanchit bahujan Aghadi) आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांची चारच दिवसांपुर्वी युती झाली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांविषयी अशा प्रकारे वक्तव्य करणे आम्हाला मान्य नाही. शरद पवार हे भाजपचे आहेत असं म्हणणं म्हणजे शरद पवार यांच्या कारकीर्दीवरून आरोप करण्यासारखं आहे. तसेच शरद पवार भाजपचे असते तर 2019 मध्ये भाजपला दूर ठेऊन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार आलेच नसते. याबरोबरच विरोधी पक्षांचे नेतृत्व म्हणून देश शरद पवार यांच्याकडे पाहतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याविषयी बोलताना शब्द जपून वापरायला हवेत, असा सल्ला संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिला होता.
काय म्हणाले अजित पवार?
प्रकाश आंबेडकर यांची उध्दव ठाकरे यांच्याशी युती झाली आहे. त्यांची महाविकास आघाडीमध्ये येण्याबाबत बोलणी सुरु आहे. मात्र त्यापार्श्वभुमीवर कुणी अशा प्रकारे वक्तव्य करून महाविकास आघाडीत मीठाचा खडा टाकत असेल तर ते योग्य नाही. कारण युती टिकवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर आम्हालाही अशा प्रकारे बोलता येतं, असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला आहे. याबरोबरच प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपून वापरावेत, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
प्रकाश आंबेडकर यांचे संजय राऊत यांना प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यावर बोलताना कोण आहे संजय राऊत? मी ओळखत नाही. माझं उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. जे बोलायचं असेल ते उध्दव ठाकरे बोलतील. याबरोबरच शरद पवार यांच्याविषयी जे बोलायचं होतं. ते मी काल बोललो, अशी प्रतिक्रीया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.