पालकमंत्रीपदावरून अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी

पालकमंत्री पदाच्या जबाबदारीवरून केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना गुरूमंत्र देईल, असं वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.;

Update: 2022-09-30 11:25 GMT

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाचे वाटप केले. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. त्यावरून अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला एक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळताना नाकीनऊ आले होते, ते सहा जिल्ह्यांना कसे न्याय देऊ शकतील, असे वक्तव्य केले होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उत्तर देत मी अजित पवार यांना गुरूमंत्री देणार असल्याचे म्हटले. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहे आणि ट्रेनिंगला कधी येऊ हे विचारणार असल्याचे म्हटले. त्यानंतर अजित पवार पुढे म्हणाले की, हे ट्रेनिंग मोफत असणार की काही फी असणार याचीसुध्दा फडणवीस यांच्याकडे विचारणार करणार असल्याचा टोला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे दिसून येत आहे.


Tags:    

Similar News