भाजप सत्तेत येताच एकनाथ खडसेंना धक्का

राज्यात सत्ताबदल होताच एकनाथ खडसे यांचे वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघावर राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे.

Update: 2022-07-29 10:07 GMT

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर खडसेंची सत्ता असलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या साडे पाच वर्षांच्या कारकिर्दीतील दुध संघाच्या कारभराच्या चौकशी साठी पाच सदस्यीय समितीही नेमण्यात आली आहे. दूध संघातील खरेदी विक्री, तसेच भरती घोटाळ्याचीही चौकशी होणार आहे. यामुळे एकनाथ खडसेंच्या अडचणीत झाल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे भाजप सत्तेत असतांना एकनाथ खडसेंनी सर्वपक्षीय पॅनल उभं करून सत्ता मिळवली होती. खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली होती. मंदाकिनी खडसें ह्या महानंदाच्या चेअरमन पद ही सांभाळ होत्या.




 


प्रशासक पदी शिंदे-फडणवीस गटाचे समर्थक

जिल्हा दूध संघाच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, यात भरती प्रक्रियेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचाही आरोप करण्यात आला होता. आता महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार आलं आणि खडसेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले गिरीश महाजन यांनी पहिलच टार्गेट दूध संघावर प्रशासक नेमण्याचे केले. एवढेच नाही तर चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आदेश काढले गेल्याने खडसेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना प्रमुख प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. विशेष म्हणजे खडसें यांचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचीही प्रशासक म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव सहकारी जिल्हा दूध उत्पादक संघाच्या प्रमुख प्रशासकांसह 11 जणांची नियुक्ती कऱण्यात आली आगे. यात भाजपचे सहा तर शिंदे शिवसेना गटाच्या पाच जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसें यांनी मात्र राज्य सरकारच्या या कारवाईवर टीका केली आहे. तसेच कोर्टात दाद मागणार असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रशासक म्हणून राज्य सरकारने आपली नियुक्त केली आहे. पण आपण सध्या मुंबईत आहोत, चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे दूधसंघाचे प्रमुख प्रशासक आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दूधसंघावर आता वर्चस्व कुणाचे?

1)मंगेश चव्हाण - आमदार भाजप, चाळीसगाव

2)चंद्रकांत पाटील आमदार शिंदे गट -मुक्ताईनगर

3)चंद्रकांत सोनवणे माजी आमदार शिवसेना -चोपडा

4) अमोल पाटील - पारोळा

5) अमोल शिंदे- पाचोरा

6)अजय भोळे- भुसावळ

7)अरविंद देशमुख - जामनेर

8)राजेंद्र राठोड-चाळीसगाव

9)गजानन पाटील- धरणगाव

10)अशोक कांडेलकर-मुक्ताईनगर

11)विकास पाटील -भडगाव

Tags:    

Similar News