काँग्रेसला प्रवेशास नकार दिल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जाहीर केली पुढची रणनिती

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-05-02 07:56 GMT
काँग्रेसला प्रवेशास नकार दिल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जाहीर केली पुढची रणनिती
  • whatsapp icon

गेल्या काही दिवसांपासून निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र प्रशांत किशोर यांनी आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रशांत किशोर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच प्रशांत किशोर यांनी ट्वीट करत पुढील राजकारणाविषयी संकेत दिले आहेत.

काँग्रेसला नकार दिल्यानंतर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी आपली पुढची रणनीति जाहीर केली आहे. प्रशांत किशोर यांनी बिहारच्या राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. प्रशांत किशोर यांनी आज सोमवारी ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी पुन्हा एकदा बिहारच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

या अगोदर प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, प्रशांत किशोर यांनी ट्वीट करत या सर्व चर्चांचं खंडन करत काँग्रेसने दिलेली ऑफर नाकारली होती.'

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर नाकारल्यानंतर आता बिहारच्या राजकारणात प्रवेश करण्याबाबत ट्वीट केले आहे. त्यामुळे प्रशांत किशोर कोणत्या पक्षात जाणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे.

Tags:    

Similar News