उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला नितेश राणे यांचे उत्तर

Update: 2022-05-15 11:10 GMT

कोरोनानंतर झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. तर देवेंद्र फडणवीस यांनी मी बाबरी पाडायला होतो अशा प्रकारे केलेल्या दाव्याला उध्दव ठाकरे यांनी खोचक शब्दात उत्तर दिले. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांना टोला लगावला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनानंतर पहिल्यांदाच जाहीर सभा घेतली. या सभेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना तुम्ही पाय जरी ठेवला असता तरी तुमच्या ओझ्याने बाबरी खाली आली असती अशा शब्दात फडणवीस यांच्यावर टीका केली. तर त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

नितेश राणे म्हणाले, तुम्ही दुसऱ्यांना त्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल, बोलण्यातील बोबडेपणाबद्दल बोलता. मग तुमच्या मुलाच्या आवाजाबद्दल कोणी म्याव म्याव आवाज काढला तर तुम्हाला वाईट का वाटतं? दुसऱ्यांची जेव्हा तुम्ही टिंगलटवाळी करता तेव्हा स्वतःबद्दल पण ऐकण्याची थोडी हिंमत ठेवली पाहिजे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीवर पाय ठेवला असता तरी बाबरी पडली असती असे उध्दव ठाकरे म्हणाले. पण जर उध्दव ठाकरे बाबरी पाडण्याच्या वेळी तिथे उभे जरी राहिले असते तरी हवेने उडून गेले असते असे आम्ही म्हणायचे का? असा सवाल नितेश राणे यांनी उध्दव ठाकरे यांना केला.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमीत्त आयोजित सभेत भाषण करताना मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडायला कारसेवक म्हणून होतो. पण त्यावेळी शिवसेनेचे कोणीच नव्हते असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्याचा समाचार घेतांना उध्दव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी पाडण्याच्या वेळी तिथे असल्याचा दावा केला. पण काय लहानपणीच चला चला चला आयोध्येला चला अशी काही मोहिम सुरू होती का? ज्यामध्ये फडणवीस यांनी कारसेवा केल्याचा दावा केला आहे. जर फडणवीस यांनी पाय जरी ठेवला असता तरी त्यांच्या ओझ्याने बाबरी कोसळली असती असा खोचक टोला फडणवीस यांना लगावला होता. त्याला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.

Tags:    

Similar News