कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये ट्रोल
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणूकांच्या निकालानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये चांगलेच ट्रोल झाले आहेत.
राज्यातील कृषी उपन्न बाजार समितीच्या निकालावरून सर्वच राजकीय पक्ष नंबर वनचा दावा करत आहेत. यात भाजप ही मागे नाही. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काल ट्विट करून करून ट्रोलर्सना टीका करण्याची आयती संधीच करून दिली.
केशव उपाध्ये यांच्या ट्विटर हँडल वरून काल कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यात भाजप नंबर वन असल्याचं ट्विट करत देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टॅग करत आकडेवारी दिली आहे. यात 201 जागा भाजपला मिळाल्याचा दावा करत इतर पक्षांनीही आकडेवारी दिली आहे. राष्ट्रवादीला 156 जागा तर काँग्रेसला 48 जागा , शिवसेना (शिंदे गट) 42 जागा तर शिवसेना (ठाकरे गटाला) 22 ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करता आल्याचं ट्विट केशव उपाध्ये यांनी केल्याने ट्विटरच्या ट्रोलर्सने ट्रोल करत 147 बाजार समिती असतांना भाजपला 201 जागा कश्या? असा सवाल उपस्थित केल्याने अनेक अनेक ट्रोलर्सने वेगवेगळ्या आकडेवारी देऊन भाजपला सवाल केला आहे. काही ट्रोलर्सने फेकफेकी बंद करा? असा सल्लाही उपाध्ये यांना दिला आहे.
आज निकाल जाहीर झालेल्या बाजार समित्यात #भाजपा नं१
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 29, 2023
अभिनंदन @Dev_Fadnavis जी @cbawankule जी
पक्षनिहाय जिंकलेल्या जागा-
भाजपा = 201
शिवसेना = 42
राष्ट्रवादी = 156
कॅाग्रेस = 48
उध्दव ठाकरे गट = 22