मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे खरा सुत्रधार कोण होता?; विजय शिवतारे यांचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड पुकारले होते. बंड पुकारण्यामागे खरा सूत्रधार कोण होता. याचा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना केला.
जून २०२२ मध्ये विधानपरिषद निवडणुकीचा पराभव स्विकारण्या आधीच एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याचा निर्णय घेतला होता. एकीकडे विधान परिषदेची निकालांची आकडेवारी समोर येत होती, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे बंडाच्या नेतृत्वासाठी सुरतमध्ये जाण्याची तयारी करत होते. त्यामुळे अनेक वर्ष शिवसेनेत घालवल्यानंतरही बंडाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी का घेतला? या प्रश्नाचा खुलासा विजय शिवतारे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीशी युती करायची हे आधीच उद्धव ठाकरे यांचे ठरले होते.
बहुमताचा आकडा कसा जुळवून अणायाचा हे आधीचं ठरले होतं. त्याचं अनुषंगाने निवडणूक लढवली जातं होती. असा दावा विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद करताना केला आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे सरकार सर्वसामान्य लोकांच्या हिताचे नाही. हे विधान मी सर्वात आधी केले होते असे शिवतारे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवास्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रेशर आणा आणि महाविकास आघाडी तोडून शिवसेना आणि भाजपचे सरकार पुन्हा आले पाहिजे.
असं मी सातत्याने एकनाथ शिंदे यांना सांगत होतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उठाव करण्याचा सल्ला मी आधीचं दिला होता. असेही शिवतारे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करण्याचा निर्णय आधीचं घेतल्यामुळे भाजपच्या मतदारसंघात काम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिवसेनेतील अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे.