अजित पवार भाजपसोबत, राज ठाकरे Active मोडवर
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज ठाकरे चांगलेच Active मोडवर गेले आहेत.
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच अजित पवार यांनी आम्हीच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली विरोधी पक्षाची स्पेस भरून काढण्याच्या उद्देशाने राज ठाकरे यांनी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक आयोजित केली आहे.
दुसरीकडे काँग्रेस आता आख्खं मैदान आपलं आहे, अशा पद्धतीने मैदानात उतरल्याची पहायला मिळत आहे. एकंदरीत राज्यात विरोधी पक्षनेते पदावर असलेला नेता एक पक्ष घेऊन सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करतो. हे कोणत्याही राज्यातील जनतेला पटण्यासारखं नाही. त्यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेली नाराजी राजकीय पक्ष आपल्या बाजूने किती प्रमाणात वळवतात, यावरच काँग्रेससह राज ठाकरे यांच्यासारख्या राजकीय पक्षांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
राज ठाकरे यांनी भाजपला साजेशी भूमिका गेल्या काही दिवसांमध्ये घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इंजिनला भाजपचं बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना भाजपने राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चावी दिल्याने राज ठाकरे यांच्या इंजिनची दिशा आता नक्की कोणत्या दिशेने धावणार याची आज या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी 10 वा. शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.