भारताचं परराष्ट्र धोरण चुकतंय का? अफगाणिस्तान संघर्षावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

Update: 2021-08-16 13:34 GMT

अफगाणिस्तानवर कट्टरपंथीय तालिबाण्यांनी वर्चस्व मिळवलं आहे. याबाबत जगभरात चर्चा सुरु असून अफगाणिस्तानमधील घडामोडींवर चिंता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात भारताचे संरक्षणमंत्री शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले...

भारत सरकारने भारतीय लोकांना अफगाणिस्तानातून आणण्यासाठी दोन विमान पाठवले, हा चांगला निर्णय आहे. पण यापुढे सीमेवरील देशांकडून अधिक सावध राहण्याची गरज आहे. आता अफगाणिस्तान म्हणत आहे की, त्यांना शांती हवीये. पुढील दिवसात यातील सत्य बाहेर येईल. पुर्वी शेजारी देशांशी आपले संबंध चांगले होते. पण आज नेपाल, बांग्लादेश, श्रीलंकेची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आपले परराष्ट्र धोरण कुठे चुकतेय का? याचा आढावा घ्यायला हवा. मात्र हे संवेदनशील विषय असल्यामुळे यात फार काही बोलता येणार नाही. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News