सोलापुरात काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्ते एकमेकांना भिडले
सोलापुरातील काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस कार्यकर्ते हे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याच प्रकार समोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळेस हा प्रकार घडला आहे.;
सोलापूर : सोलापुरातील काँग्रेस भवन मध्ये काँग्रेस कार्यकर्ते हे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याच प्रकार समोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळेस हा प्रकार घडला आहे.
सोलापूर महापालिकेचे माजी परिवहन सभापती केशव इंगळे आणि शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यामध्ये झालेला वाद आता समोर आलेला आहे.
अवघ्या एका वर्षावर सोलापूर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली असताना सोलापूर महापालिकेतील अंतर्गत गटबाजी यानिमित्ताने समोर आलेली पाहायला मिळतं आहे.
यानंतर राजकिय चर्चांना उधाण आलं आहे.एकीकडे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते पक्ष बांधणीला लागले असताना काँग्रेसमधील ही गटबाजी आणि वाद चव्हाट्यावर आल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे. या प्रकरणी आता काँग्रेसचे वरीष्ठ नेते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.