आकडे जाहीर न करता जुन्या पेन्शन योजनेवरून धुळफेक सुरू, आमदार अभिजित वंजारी यांचे टीकास्र
राज्यात जुन्या पेन्शन योजनेवरून रान पेटलं आहे. त्यातच सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. त्यापार्श्वभुमीवर आमदार अभिजित वंजारी यांनी सरकारवर टीका करताना म्हणाले की, आकडे जाहीर न करता सरकार फक्त कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहे. ही धुळफेक थांबवा आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी भूमिका अभिजित वंजारी यांनी घेतली आहे.