चूल पेटवून, भाकरी करत गॅस दरवाढीचा निषेध

दोन दिवसांपूर्वी देशातील सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ केली. याचा निषेध सर्वचं स्तरातून होताना पाहायला मिळत आहे. या दरवाढीमुळे घरातील महिलांचे बजट कोलमडले आहे.

Update: 2023-03-03 09:04 GMT

केंद्र सरकारने (gas price hike) गॅस सिलेंडर मागे ५० रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीची (Aam Aadmi Party) निदर्शने आज यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल पेटवून भाकरी करत गॅस दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध केला. गॅस दरवाढ (gas price hike) रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी 'तेरी तानाशाही नहीं चलेगी, भ्रष्टाचार का एक ही काल केजरीवाल केजरीवाल अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. सोलापुरात आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) रस्त्यावर चूल पेटवली आणि स्मृती इराणी यांना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल महिलांनी यावेळी विचारला. १०० रुपयात उज्वला गॅस कनेक्शन दिले. मात्र एका गॅस मागे १२०० रुपये मोदी सरकार घेत आहे. या सरकारला याची लाज वाटत नाही का? असा प्रश्न आम आदमी पार्टीच्या (Aam Aadmi Party) महिलांनी केंद्र सरकारला विचारला आहे. ही दरवाढ तात्काळ रद्द झाली पाहिजे अन्यथा आम आदमी पार्टी पेटून उठेल, असा इशारा आम आदमी पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आला.

Tags:    

Similar News