तामिळी व्यक्तीलाही बाळासाहेब ठाकरे यांची भुरळ, अंबादास दानवे यांनी सांगितला किस्सा
राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी एक किस्सा सांगितला.;
राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे विरुध्द उध्दव ठाकरे(Eknath Shinde Vs Uddhav Thackeray) यांच्यात संघर्ष सुरु आहे.मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्र लावण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी शांतीसेनेतील एका दिक्षीत नावाच्या अधिकाऱ्याचा किस्सा सांगितला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, काही दिवसांपुर्वी मला पुण्यातील एक दिक्षीत नावाचे अधिकारी भेटले. ते शांतीसेनेत काम करत असताना त्यांना एका तमिळ (Tamil) व्यक्तीने तुम्ही कुठले आहात? अशी विचारणा केली. त्यावेळी दिक्षीत (Dikshit) यांनी पुणे(Pune)-मुंबई (Mumbai) असं सांगितलं. त्यानंतर त्या व्यक्तीने तुमच्याकडे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा फोटो आहे का? अशी विचारणा दिक्षीत यांना केली. त्यावेळी दिक्षीत म्हणाले, नेमका का हवा आहे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो? त्यावेळी त्या व्यक्तीने सांगितले की, आमच्याकडे धर्मांतर होत आहे. आमचं एकच हिंदू घर आहे. त्यामुळे आमच्या देव्हाऱ्यात मला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावायचा आहे, असा किस्सा दिक्षीत यांनी अंबादास दानवे यांना सांगितल्याचे म्हटले.