माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.;

Update: 2021-08-10 05:38 GMT

मुंबई:मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे सिंग यांना आता परदेशात जाता येणार नाही. परमबीर सिंग यांच्यावर दिवसेंदिवस कारवाईचा फास आवळत चालला आहे. आतापर्यंत त्यांच्याविरोधात ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिवाय त्यांच्यावर होणारे आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण अधीकच वाढत चालले आहे. दरम्यान परमबीर सिंग मुंबईत नसल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात "लुक आऊट" नोटीस जारी केली आहे. त्याची माहिती विमानतळासह संबधित यंत्रणांना देण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्यासह आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे

सिंग यांना न्यायालयाने 28 जुलै पर्यंत दिलासा दिला होता. त्यानंतर मुदत संपण्याच्या पूर्वसंध्येलाच मुंबई पोलिसांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात "लूक आऊट" नोटीस जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोबतच त्यांना कोणत्याही क्षणी अटक देखील होऊ शकते. त्यामुले पोलीस वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Tags:    

Similar News