देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये कोण बाजी मारेल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मॅक्स महाराष्ट्रची टीम पंजाबमध्ये ग्राऊंडवर फिरुन इथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला संधी असल्याचा अंदाज निवडणूकपूर्व पोलमधून काही माध्यामांनी व्यक्त केला आहे. 'आप'च्या कार्यकर्त्यांनाही विजयाचा विश्वास वाटतो आहे, या कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास का वाटतो आहे, याबाबत अमृतसरमधील आपच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी...