फसवणुकीचे मोठे षडयंत्र रचले जात आहे ; प्रकाश आंबेडकरांचा दावा

सुमारे तीस वर्षांपूर्वी गुजरातमधील गोध्रा आग आणि त्यानंतर झालेल्या दंगलींची चर्चा आजही केली जाते. या मुद्द्यावरून बरेच राजकारण झाले आहे. आता पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरून चर्चा सुरू झाली आहे.;

Update: 2023-03-16 06:36 GMT

गोध्रा जळीतकांडावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी गंभीर दावा केला आहे. मुस्लिम समाजाने भाजपला (BJP) मतदान करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धार्मिक मुद्द्यावरून राजकारण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा (Buldhana) येथील सभेत बोलताना सांगितल की मुस्लिम समाजाने भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले.

मला शंभर टक्के विश्वास आहे की मुस्लिम कोणत्याही परिस्थितीत कमळाला मतदान करणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की मी आता मतदान केले तर प्रत्येक गावात गोध्रा होणार नाही. ही गोष्ट त्यांच्या डोक्यात पक्की आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मी भाजपच्या लोकांना गोध्रा दंगलीवर माझ्यासोबत बसण्याचे खुलेपणाने आव्हान दिले होते. कारण त्यांनी तो ट्रेनचा (train) डबाही जाळण्याचा प्रयत्न केला होता. पण ट्रेन ही बाहेरून जळत नाही. तुम्हाला कोणती शंका असेल तर तुम्ही तेही करून पहा. बाहेरून पेट्रोल किंवा डिझेल टाकुन पाहा परंतु असे केल्याने देखील रेल्वे बाहेरुन जळत नाही ती तशीच राहते.

काय रंगवले आहे माहीत नाही परंतु ट्रेनचा डब्बा हा बाहेरुन जळत नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो. तेव्हाच ती पेटते असा दावा प्रकाश आंबेडकर करतात. प्रकाश आंबेडकर यांनी असा गंभीर आरोप लावला आहे की रेल्वेचा डबा आतून पेटवायचा म्हणजे आत जो कोणी बसला होता त्याने तो पेटवला असावा. दुसरा कोण पेटवणार आहे? त्यामुळे येथे फसवणुकीचे मोठे षडयंत्र रचले जात आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Tags:    

Similar News