जिंदाल कंपनीत बॉयलरचा स्फोट, ११ कामगार जखमी

नाशिक जिल्ह्यातील मुंडेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीतील जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट होऊन २५ गावांना हादरा बसला. परंतू आग कशामुळे लागली, त्याचं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.;

Update: 2023-01-01 09:57 GMT

नाशिक जिल्ह्यायीत मुंढेगाव MIDC तील एका कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नाशिक जिल्ह्यातील मुंढेगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीतील जिंदाल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे २५ गावांना हादरा बसला. परंतू आग कशामुळे लागली त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ११ गाड्या रवाना झाल्या. अग्निशामक दलातील जवान आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

त्याबरोबरच आग लागली त्यावेळी कंपनीत ३० कामगार काम करत होते. त्यापैकी आगीमुळे ११ कामगार जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतू मृत कामगारांचा आकडा अद्यापही समोर आला नाही.आग कशामुळे लागली याचा तपास नाशिक पोलिसांनी ताबडतोब करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच जिंदाल कंपनीत काही तांत्रिक अडचणींमुळे आग लागली असण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Tags:    

Similar News