महाराष्ट्रात 100 कोटीत बना कॅबिनेट मंत्री! ठगांची आमदारांना ऑफर, चौघांना अटक

महाराष्ट्राला १०० कोटींचे शु्क्लकाष्ट लागले असून १०० कोटींच्या आरोपावरुन एक माजी मंत्री जेलमधे असताना आता भाजपाच्या तीन आमदारांना १०० कोटीत कॅबिनेट मंत्री बनवण्याची ऑफर देणाऱ्या चार ठगांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Update: 2022-07-21 06:25 GMT

 महाराष्ट्राला १०० कोटींचे शु्क्लकाष्ट लागले असून १०० कोटींच्या आरोपावरुन एक माजी मंत्री जेलमधे असताना आता भाजपाच्या तीन आमदारांना १०० कोटीत कॅबिनेट मंत्री बनवण्याची ऑफर देणाऱ्या चार ठगांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

अलिकडेच महाराष्ट्रात सत्तापरीवर्तन झालं आहे. अनेक दिवस उलटूनही राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाले नाही. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातून अनेक आमदारांनी मंत्रीपदासाठी फिल्डींग लावली आहे. एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेने रियाझ शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी या चार आरोपींना अटक केली आहे. सरकारी वकिल अजय उमापती दुबे यांनी सांगितले की, किल्ला कोर्टाने सर्व आरोपींना 26 जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. एफआयआरनुसार आमदाराला कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे मुंबई गुन्हे शाखेने कालच किल्ला कोर्टात दिलेल्या रिमांड अर्जात या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. 17 जुलै रोजी रियाज शेख यांनी आमदार सचिवांना अनेकवेळा फोन करून सांगितले की, आज 4 वाजता आमदाराची बैठक आहे, मात्र ते फोन उचलत नाहीत. दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांची त्यांच्या सचिवासोबत सायंकाळी साडेचार वाजता बैठक ठरलेली होती. सेक्रेटरींनी रियाजच्या वारंवार कॉल्सबाबत सांगितले. रियाझने 12 जुलैला फोन करून तुम्हाला 100 कोटी रुपयांत कॅबिनेट मंत्री बनवतो, असे सांगितल्याचे आमदाराने सांगितले.आमदाराने रियाझला सचिवांमार्फत सायंकाळी 5:15 वाजता हॉटेल कॅफेमध्ये भेटण्यास सांगितले. तेथे रियाझ यांनी आमदारासोबत प्रदीर्घ भेट घेतली. केली 18 कोटी रुपयांची आगाऊ मागणी केली.

रियाझने 90 कोटी रुपयांचा सौदा निश्चित केला, परंतु 18 कोटी रुपये आगाऊ मागितले.आमदारांनी दुसऱ्या दिवशीपर्यंत वेळ घेऊन हा प्रकार आपल्या सचिवांना सांगितला.रियाजला 18 जुलै रोजी दुपारी 1:15 वाजता नरिमन पॉइंट येथे बोलावण्यात आले आणि मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाला माहिती देण्यात आली.रियाझ तिथे पोहोचल्यावर आमदार त्याला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले.साध्या गणवेशातील गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले आणि रियाजला अटक केली.त्याच्याकडे चौकशी केली असता, उर्वरित आरोपींची नावे देखील उघड झाली.

भाजप आमदार राहुल कुल यांचे खासगी सचिव ओंकार थोरात यांना 17 जुलैला अज्ञात आरोपीने फोन केला होता. त्याने आपले नाव रियाजभाई असे सांगितले होते. या रियाजभाईने आपण दिल्लीवरून आलो आहोत, राहुल कुल यांनी भेटण्यासाठी बोलावणं आणि दुपारी 4 वाजता वेळ दिली होती. त्यांना कुठे भेटता येईल अशी विचारणा केली होती. या भेटीनंतर या रियाजने ओंकार थोरात यांना फोन केला आणि कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळवून देण्यासाठी 100 कोटी मागितले, असल्याचे सांगितले. त्यानंतर कुल यांनी या रियाजला हॉटेल ओबेरॉयमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी रिजायसोबत दीड तास चर्चा झाली. यावेळी 100 कोटींवरून 90 कोटींवर डील झाली. या डीलनुसार 20 टक्के रक्कम म्हणजेच 18 कोटी देण्याचे ठरले. बाकीचे पैसे हे मंत्रिपद मिळाल्यावर देण्याचे ठरले.

राहुल कुल यांना या रियाजवर संशय आला. या रियाजने इतरही आमदारांना असे फोन केले होते. त्यामुळे कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची माहिती दिली. त्यानंतर फडणवीस यांनी मुंबईच्या गुन्हे शाखा पोलिसांना सूचना केली. त्यानंतर या रियाजला 18 कोटी देण्यासाठी हॉटेल ऑबेरॉयमध्ये बोलावलं. या भेटीच्या वेळी आमदार जयकुमार गोरे सुद्धा हजर होते. रियाज हॉटेलमध्ये आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. कुल यांनी रियाजसोबत बोलणं झालेले सर्व संभाषण पुरावे म्हणून पोलिसांना दिले आहे.

याबाबत मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रविंद्र आंबेकर यांनी ट्विट केले असून शंभर कोटी काय महाराष्ट्राची पाठ सोडत नाही, असं म्हटलं आहे. 

रियाजने गुन्हे शाखेला सांगितले की, योगेशने त्याची सागरशी ओळख करुन दिली होती.एका आमदाराला मंत्री बनवण्याचा दर दिल्लीत 50 ते 60 कोटी आहे, असे सांगवई म्हणाले होते.योगेशने रियाजकडून आमदाराचा बायोडाटा मागून सागरला व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केला होता.सागरने चौकशीत जाफर उस्मानी हा सूत्रधार असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेने त्याला अटकही केली.सर्व आरोपींकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. मोबाईल आणि सिमकार्ड देखील जप्त करण्यात आलं आहे. याबाबत सोशल मिडीयावरुन तर्कवितर्क सुरु असून १०० कोटी रुपयांत आमदार मंत्री व्हायला तयार असतील तर राजकारणाचा बाजार तर झाला नाही ना अशी चर्चा सुरु आहे. 



Tags:    

Similar News