मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अमित शहा यांना विठ्ठल रूक्मिणीची मुर्ती भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा, काय घडलं आत्तापर्यंत…;

Update: 2022-07-08 17:14 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी ची मु्र्ती भेट दिली आहे.

दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील विविध नेत्यांची भेट घेणार आहेत.

त्यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ते उद्या ९ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यात मंत्री मंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिली.

अमित शहा यांच्या भेटीपुर्वी काय घडलं?

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत.

दोन्ही नेते नियोजित दौऱ्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीतील अतिथिगृहामध्ये न्यू महाराष्ट्र सदनात ८ वाजता पोहोचले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बातचीत करताना ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचं सांगितलं.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, पंतप्रधान यांची मी सदिच्छा भेट घेण्यासाठी दिल्लीला आलो आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट आम्ही घेणार आहोत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची देखील आम्ही घेणार आहोत. दिल्ली दौऱ्यात मंत्री पदाच्या खाते वाटपाची चर्चा होणार आहे. तसेच ११ जुलै ला होणाऱ्या सुनावणीबाबत ते म्हणाले, 11 जुलैला सुनावणी आहे, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील सीएम सुट मध्ये प्रवेश केला.

Full View

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अवघे १५ मिनिटं या ठिकाणी थांबले आणि तात्काळ महाराष्ट्र सदनातून निघाले. त्यांनी माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही. ते दरम्यानच्या काळात कुठं होते. हे कुणालाही समजले नाही.

दरम्यान साधारण दीड तास महाराष्ट्र सदनामध्ये थांबल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी निघाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले अद्यापपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे चर्चा झाल्यानंतरच मी माध्यमांशी चर्चा करेल. यावेळी तुम्ही आता कोणाला भेटण्यासाठी जात आहात? असा सवाल केला असता,

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, अमित शहा यांची भेट घेण्यासाठी आलं असल्याचं सांगितलं. मात्र, ते आत्ता कोणाच्या भेटीसाठी जात आहेत. असा प्रश्न केला असता यावर उत्तर देणं टाळलं.

मॅक्समहाराष्ट्रला मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना विठ्ठल रुख्मिणीची मृती भेट दिली.

Full View

Tags:    

Similar News