Home > Uncategorized > मोदींच्या नव्या टीममध्ये कोण ?

मोदींच्या नव्या टीममध्ये कोण ?

मोदींच्या नव्या टीममध्ये कोण ?
X

दुसऱ्यांदा बहुमत मिळवत पंतप्रधानपदावर विराजमान होणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार आणि मावळत्या मंत्रिमंडळातील कुणाचे पत्ते कट होणार, याविषयी आता चर्चेला सुरूवात झालीय. जुन्याच सहकाऱ्यांना पुन्हा संधी देणार की नव्या सहकाऱ्यांवर महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देणार याविषयी चर्चा सुरू झालीय. मंत्रिमंडळ, उमेदवारी आणि पक्षसंघटनेत जबाबदारी देतांना मोदींनी कायम धक्कातंत्राचा वापर केल्यानं नव्या टीम मोदींविषयी उत्सुकता

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे मोदींचे जुने आणि विश्वासू सहकारी. अमित शहा यांच्या राजकीय व्यवस्थापन कौशल्याचा फायदा या निवडणुकीत भाजपाला झालेला दिसतोय. शाहमुळे प.बंगालामध्ये मोठा विजय मिळाला आहे. गृह खात देऊन मोदी त्याचा सन्मान करतात की संघठन कौशलत्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ घालतात अर्थखात्याचे मंत्री अरुण जेटली यांचेही मोदींशी तेवढे चांगले सौख्य नाही. मात्र अर्थमंत्री पदावर त्यांनी चांगले काम केलय..पक्ष अडचणीत असताना ते नेहमी मदतिला धावून आलेले आहेत मात्र तब्येतीमुळे मंत्रिपद मिळेल का हि शंका आहे. जेष्ठ्य नेत्या सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढवली नजी आणि त्या राज्यसभेच्या सदस्य नाहीत. तसेच त्यांचा अडवाणींशी असलेला स्नेहबंधाचा फायदा होणार कि तोटा हे यावर अवलूंबून आहे. पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये सगळ्यात आघाडीवर गडकरींचे नाव होते, भावी पंतप्रधान म्हुणुन त्याच्याकडे पहिले जात होते. पूर्ण बहुमत मिळाल्याने गडकरींचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. नवीन जबाबदारी मोदी देणार. राजनाथ सिंह हे मोदींच्या जवळचे मंत्री. त्यांना गृहमंत्रीपद देण्यात आलेलं. त्याच्या चांगल्या कामगिरीला पाहून नवीन मंत्रिपदाची जबाबदारी मिळू शकते. पियुष गोयल यांना अजून एखाद मोठं मंत्रीपद मिळू शकेल. उमा भारतींच्या ऐवजी प्रज्ञा सिंहला मंत्रीपदाची संधी दिली जाते कि साक्षी महाराजांता मंत्रिमंडळात प्रवेश होतो, हे पाहावे लागेल. स्मृती इराणी यांना राज्यसभेवर पाठवून मंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, आता इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केल्यानं त्यांना 2014 च्या तुलनेत महत्त्वाचं खातं दिलं जाण्याची शक्यता आहे. कारण त्या मोदींच्या विश्वासातल्या समजल्या जातात. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधींना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार कि त्याचा मुलगा वरून गांधी यांचं पुर्नवसन करणार. व्ही.के.सिंग यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. हरदीप पुरी, के, जे.अल्फोस आणि मनोज सिंह यांच्या जागी नवीन चेहरे मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे.

Updated : 24 May 2019 6:40 PM IST
Next Story
Share it
Top