Home > Uncategorized > सुर्यमाळ आश्रम शाळा की गुरांचा गोठा?

सुर्यमाळ आश्रम शाळा की गुरांचा गोठा?

सुर्यमाळ आश्रम शाळा की गुरांचा गोठा?
X

कुठे पत्रेच फुटलेत तर कुठे पत्र्यातुन पाणी झिरपतेय यामुळे फरशीवर पाणी साचलय त्यातच कशाबशा गाद्या टाकुन झोपायचे तिथे तुटक्या मुडक्या पत्र्याच्या पेट्या कोपऱ्यात सरकवकलेल्या पहील्याच ओल्या झालेल्या खोल्यात वर कपडे सुकवायचे बॅगाला भिंतीला लटकवायाच्या अन हो भिंतीही चिंब ओल्या त्यामुळे फळाही ओला दरवाज्यातुन पाणी खिड्कीतुन पाण्याचे शिंतोडे याच खोलीत जेवायचे झोपायचे अन शिक्षणही याच खोलीत घ्यायचे हे ही स्थिती वाचून वाटेल कि एखाद्या गुरांच्या गोठ्याचे वर्णन आहे पण नाही ही विदारक स्थिती आहे मोखाडा तालुक्यातील सुर्यमाळ आश्रमशाळेच्या वर्ग खोल्यांचे याहीपेक्षा भयंकर म्हणजे या मुलांसाठी हक्काच्या ईमारतीचे काम या गावात चालु आहे मात्र पाच वर्ष होवूनही ते पूर्ण होत नसल्याने विद्यार्थ्याना मरनयाताना भोगाव्या लागत आहेत

सन 2013 मध्ये वैष्णवी कंट्रकशन्स येथील नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेतले आहे परंतु मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे या बांधकामाला कायमची मरगळ आली आहे

आजतायत या इमारतीच्या बांधकामावर 7 कोटी 8 लाख खर्च झाला असताना 50% टक्केच काम झाले आहे परंतु झालेले काम सुद्धा अतिशय निकृष्ट आहे या नवीन बांधकामाला हात जरी लावला तरी बांधकाम खाली पडते

अशी अवस्था या बांधकामाची आहे यामुळे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे व सुज्ज इमारतीच्या नावाखाली आदिवासी मुलांचा जीव धोक्यात घालायचा का...?

असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांकडून विचारला जात असून चार वेळा विधानसभेत लक्षवेधी होऊन सुद्धा या आश्रम शाळेचा प्रश्न सुटलेला नाही

व तसेच यात महत्वाची बाब म्हणजे या नवीन इमारतीची अंदाजपत्रक रक्कम 6 कोटी 14 लाख आहे परंतु खर्च मात्र 7 कोटी 14 लाख झाला आहे यामुळे ठेकेदाराने 1 कोटी जास्त खर्च खिशातून केला का. ! असा विचारला जात असुन यात मोठे काळेभेर असल्याचे समोर आले आहे

जव्हार प्रकल्प कार्यालयांतर्गत ३० शासकीय आश्रमशाळा असून यातील १३ ईमारतीच्या नुतनीकरणाला मंजुरी मिळून जवळपास सर्वच्या सर्व तयार झाल्या मात्र यातील सुर्यमाळ आणि पळसुंडा या दोन्ही आश्रमशाळेचे काम ठेकेदार आणि बांधकाम अधिकारी यांच्या चालढकल कारभारामुळे रखडले आहे यातील पळसुंडा आश्रमशाळेचे बांधकाम जवळपास ७ वर्षापासून तर सुर्यमाळ आश्रमशाळेचे काम ५ वर्षापासून सुरुच असून अजून किती वर्ष लागतील हाही प्रश्नच आहे.मात्र यामुळे झालय काय जुन्याच ईमारतींवर दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली मोठ्याप्रमाणावर पैसे खर्च होत असूनही आजघडीला दोन्ही आश्रमशाळेची स्थिती पाहील्यास अक्षरशः गुरांच्या गोठ्यापेक्षाही भयाण वास्तव याठीकाणी समोर येते.

कारण ५५० चा पट असलेली सुर्यमाळ शाळा येथे १ ते १२ चे वर्ग चालतात यासाठी असलेल्या १० वर्ग खोल्यातकी एकही खोली अशी नाही कि जी गळत नाही यामुळे फरशीवर अक्षरशः पाणी साचतय त्याच परीस्थिती येथील विद्यार्थी गादी टाकून पाण्यात झोपतात तिथेच जेवतात तिथेच शिक्षण अन तिथेचे अभ्यास अभ्यासाठी एवढ्या मोठ्या खोलीत एक बारीकशा दिवा एकुणच काय तर शैक्षणिक वातावरणाचा लवलेशही नसलेल्या तुटक्या मोडक्या वर्ग खोल्यात जिथे सर्व सामान्य माणूस उभा राहु शकत नाही अशा परीस्थितीत येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि याला जबाबदार फक्त प्रशासकीय हलगर्जीपणा आहे असे चित्र आहे यामुळे याला जबाबदार ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

चौकट

प्रकाश निकम यांच्या उपोषणाचा धसका...

जिल्हा परिषद सदस्य गटनेते प्रकाश निकम यांनी उपोषणाचे निवेदन देताच सूर्यमाळ आश्रम शाळेवर 10 वि 12 वि ला विज्ञान विषयाला तात्काळ शिक्षक देण्यात आले आहेत व अनेक वर्षे

खितपत पडलेल्या गळक्या वर्ग खोलवर नवीन पत्रे टाकण्यात आले आहेत

परंतु असे असले तरी येथील मुलांना कायम स्वरूपी सोयीसुविधा मिळव्यात आश्रम शाळेचे नवीन बांधकाम निकृष्ट दरजेचे करणाऱ्या ठेकेदारावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत वैष्णवी कंट्रकशन्स ला काळ्या यादीत टाकावे आदी मागण्यासाठी पालघर जिल्हा परिषदचे सदस्य गटनेते प्रकाश निकम सूर्यमाळ आश्रम शाळेवर मागण्या पूर्ण होई पर्यत येथील गावकरी विद्यार्थी सह 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी सूर्यमाळ आश्रम शाळेवर उपोषणास बसणार आहेत

Updated : 8 Aug 2018 6:42 PM IST
Next Story
Share it
Top