Home > News Update > राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव - अमित शहा

राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव - अमित शहा

राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव - अमित शहा
X

जम्मू- काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट ६ महिन्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत मांडला. तसेच निवडणूक आयोग यावर्षीच्या अखेरीस राज्यात निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेईल, असे अमित शहा यांनी लोकसभेत सांगितले. मात्र, जम्मू- काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट कालावधी वाढविण्यास काँग्रेसने जोरदार विरोध केला.

सरकार स्थापनेसाठी कोणताही पक्ष तयार नव्हता. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करून विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. ९ डिसेंबर २०१८ रोजी राज्यपाल राजवटीचा कालावधी संपलयानंतर कलम ३५६ चा वापर करत २० डिसेंबरपासून पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू केली. २ जुलैला राष्ट्रपती राजवटीचा सहा महिन्याचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवावा, असा प्रस्ताव अमित शहा यांनी लोकसभेत मांडला.

Updated : 28 Jun 2019 5:42 PM IST
Next Story
Share it
Top