महाराष्ट्रात 'वंचित'मुळे कॉग्रेस राष्ट्रवादीला 8 मतदारसंघात फटका
Max Maharashtra | 25 May 2019 10:42 AM IST
महाराष्ट्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या दारुण पराभवाला वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर असल्याचं आकडेवारवरुन दिसून येतं. कारण वंचित आघाडीचा मतदार हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदार राहिला आहे. जवळपास 08 जागांवर वंचितच्या उमेदवारांना पडलेल्या मतांमुळं काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांना जवळपास मोठा फटका बसलाय.
१) बुलढाणा
बुलढाणा (वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत, 1 लाखापेक्षा अधिक मतं)
शिवसेना : प्रतापराव जाधव – 521977
राष्ट्रवादी - राजेद्र शिंगणे- 388690
वंचित आघाडी - बळीराम शिरस्कार 172627
विजयी उमेदवार - शिवसेना उमेदवार प्रतापराव जाधव 1,33286
2) अकोला – विरोधी अर्थात कॉंग्रेस पक्षापेक्षा वंचित आघाडीला अधिक मतदान
भाजप - संजय धोत्रे -554444
कॉंग्रेस - हिदायत पटेल 254370
वंचित आघाडी - अँड प्रकाश आंबेडकर 278848
विजयी उमेदवार - भाजप - संजय धोत्रे -275596
अकोल्यात कॉंग्रेसमुळे प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला आहे. जर कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत प्रकाश आंबेडकरांनी आघाडी केली असती तर प्रकाश आंबेडकर निवडणूक जिंकले असते.असं आकडेवारीमुळं दिसून येतं.
3) गडचिरोली चिमूर (वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत, 1 लाखापेक्षा अधिक मतं)
भाजप - अशोक नेते 519968
कॉंग्रेस राष्ट्रवादी - नामदेव उसेंडी - 442442
वंचित बहुजन आघाडी - डॉ रमेश गजबे - 111468
विजयी उमेदवार भाजप - अशोक नेते - 77,526
4) नांदेड ( वंचितच्या उमेदवारामुळे कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव, वंचितच्या उमेदवाराला 1 लाखांपेक्षा अधिक मतं)
भाजप - प्रताप पाटील चिखलीकर - 486806
कॉंग्रेस - अशोक चव्हाण - 446658
वंचित बहुजन आघाडी - प्रा. यशपाल भिंगे - 166196
विजयी उमेदवार - प्रताप पाटील चिखलीकर - 40,148
5) परभणी (वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १ लाखा पेक्षा अधिक मतं मिळाली, वंचितच्या उमेदवारामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत )
शिवसेना - संजय जाधव - 538941
राष्ट्रवादी - राजेश विटेकर - 496742
वंचित बहुजन आघाडी - आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (मुस्लीम ) - 149946
विजयी उमेदवार शिवसेना - संजय जाधव - 72199
6) सोलापूर (वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १ लाखा पेक्षा अधिक मतं मिळाली, वंचित मुळे कॉंग्रेस उमेदवार पराभूत)
भाजप : जयसिद्धेश्वर स्वामी - 524985
कॉंग्रेस : सुशिलकुमार शिंदे : 366377
वंचित बहुजन आघाडी : प्रकाश आंबेडकर 170007
विजयी उमेदवार : जयसिंद्धेश्वर स्वामी - 1,58,608
7) सांगली (वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १ लाखांपेक्षा अधिक मतं, आघाडीचा उमेदवार पराभूत)
भाजप - संजयकाका पाटील: 508995
स्वाभिमानी शे.सं - विशाल पाटील : 344643
वंचित बहुजन आघाडी- गोपिचंद पडळकर : 300234
विजयी उमेदवार - संजयकाका पाटील उमेदवार : 1,64,352
8) हातकणंगले (वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १ लाखांपेक्षा अधिक मतं, आघाडीचा उमेदवार पराभूत)
शिवसेना : धैर्यशिल माने - 585776
स्वाभिमानी शेतकरी संघटना : राजू शेट्टी - 489737
वंचित बहुजन आघाडी : अस्लम सय्यद - 123419
विजयी उमेदवार : धैर्यशिल माने शिवसेना - 96,039
Updated : 25 May 2019 10:42 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire