Home > Uncategorized > ल्यारीन्क्स (स्वरयंत्र) कॅन्सर

ल्यारीन्क्स (स्वरयंत्र) कॅन्सर

ल्यारीन्क्स (स्वरयंत्र) कॅन्सर
X

इतर प्राण्यांपेक्ष्या मानवाचे वेगळेपण म्हणजे आपल्याला बोलता येते. त्यासाठी लागणारे स्वरयंत्र (ल्यारीन्क्स) हे गळ्यामध्ये घशाच्या खाली व श्वासननलिकेच्या वरती असते. त्याची रचना अन्न नलिकेच्या समोरच्या बाजूस असून अन्न गिळताना श्वास कोंडला जाणे, अन्न व पाण्यास श्वासननलिकेत उतरण्यास मज्जाव करून फुफुसाचे रक्षण करणे, आवाज करणे, खोकला काढणे इत्यादी कार्य करते. स्वरयंत्राचे, सुप्रा ग्लोटीस, glotओकल कॉर्ड,al cor आणि इन्फ्रा ग्लोटीस (infra glotis) अश्या तीन भागात विभाजन केले जाते.

जगामध्ये दरवर्षी दीड लाखांपेक्षा जास्त रुग्ण ल्यारीन्क्स कॅन्सरने पिडीत असून भारतीय पुरुषांमध्ये दरवर्षी तेवीस हजार रुग्ण या कॅन्सरने पिडीत होतात. स्त्रियांमध्ये हेच प्रमाण केवळ अडीच ते तीन हजार इतके आहे. भोपाळ, दिल्ली येथे सर्वात जास्त तर नागलंड, बार्शी इथे सर्वात कमी हा रोग आढळतो.

ल्यारीन्क्स कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?

बहुतांशी हा रोग ६० वर्षांनंतर उदभवणारा असून ६० ते ७० वयादरम्यान या कॅन्सरचे जास्त रुग्ण आढळतात. तंबाखूमुळे ल्यारीन्क्स कॅन्सर होतो हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. बिडी, सिगारेट ओढणे, खैनी, मावा, गुटखा, पानमसाला, जर्दा इत्यादी तंबाखू खाण्याच्या सवयी त्यासाठी कारणीभूत ठरु शकतात. याशिवाय मद्यपान, चुलीवर स्वयंपाक करतानाचा धूर देखील या कँन्सरचे कारण असू शकते.

ल्यारीन्क्स कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-

  • आवाज बदलणे.
  • अन्न गिळता न येणे.
  • अन्न गिळताना दुखणे.
  • मानेला सूज/ गाठ येणे.
  • घशात दुखणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे.
  • खोकला येणे.
  • वजन कमी होणे.

तपासणी:- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, व सीटी स्कॅन करावा. खरोखरीच कॅन्सर आहे की नाही व तो किती पसरलेला आहे हे पहाण्यासाठी ल्यारीन्गोस्कोपी करून किंवा Paoscopy तुकडा काढून तपास करावा.

ल्यारीन्क्स कॅन्सरचे उपचार कसे करावे?

ल्यारीन्क्स कॅन्सरचे उपचार करीत असताना रोग बरा होण्यासाठी तडजोड न करता, शक्य असल्यास स्वरयंत्र वाचविण्यास प्राथमिकता दिली जाते. जेणे करून रुग्णास उपचारानंतर बोलता यावे.

वर उल्लेख केल्या प्रमाणे ओकल कॉर्ड स्वरयंत्र/ल्यारीन्क्सचे तीन भागात विभाजन होते. तीन भागाचे खालीलप्रमाणे उपचार पाहू.

सुप्रा ग्लोटीस (Supra Glottis) कॅन्सर :

या भागात असणाऱ्या रोगाची खासियत म्हणजे कमी वेळात रोगाची जोरदार वाढ तसेच गळ्यात लिम्प नोडच्या गाठीमध्ये लवकर पसरणे ही होय. तसेच या भागाच्या विशिष्ट ठेवणीमुळे शस्त्रक्रिया करून संपूर्ण रोग काढणे कठीण जाते. त्यामुळे रोग सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास शस्त्रक्रिया न करता, रेडीओथेरपी तसेच सोबत केमोथेरपीचे उपचार केले जातात. रोग फार पसरलेला असल्यास शस्त्रक्रिया करून काढला जातो व नंतर रेडीओथेरपी आणि केमोथेरपीचे उपचार केले जातात.

ओकल कॉर्ड (Vocal Cord)कॅन्सर :

ओकल कॉर्डमध्ये लिम्प पेशी नसल्या कारणांने इथे होणारा रोग गळ्यामध्ये पसरत नाही त्यामुळे गळ्याचे उपचार करण्याची गरज पडत नाही. छोटी गाठ असेल तर ल्यारीन्गोस्कोपी करून रोग कापून काढला जातो किंवा लेझर थेरपी करून गाठ नष्ट केली जाते. रोग अँडव्हान्स असल्यास रेडीओथेरपी तसेच सोबत केमोथेरपीचे उपचार केले जातात. रोग वरच्या भागास पसरल्यास सुप्रा ग्लोटीस (supra glotis) कॅन्सरप्रमाणे तसेच खालच्या भागास पसरल्यास इन्फ्रा ग्लोटीस (infra glotis) कॅन्सरप्रमाणे उपचार करावेत.

इन्फ्रा ग्लोटीस (Infra Glottis)कॅन्सर :

रोग सुरुवातीच्या टप्प्यात असल्यास आवाज वाचविण्यासाठी, रेडीओथेरपी तसेच सोबत केमोथेरपीचे उपचार केले जातात. कधीकधी रोग मोठा असल्यास केमोथेरपीचे उपचार दर तीन आठवड्याने दिले जातात व नंतर रेडीओथेरपी आणि केमोथेरपीचे उपचार केले जातात. रोग फार पसरलेला असल्यास सुप्रा ग्लोटीस (supra glotis) कॅन्सरप्रमाणे उपचार केले जातात.

रेडीओथेरपी

ईबीआरटी रेडीओथेरपी मध्ये आयएमआरटी उपचार पध्दती अधिक सोयीस्कर असून रेडीओथेरपीशी संबंधित दुष्परिणाम कमीत कमी ठेवता येतात. ते शक्य नसल्यास किंवा त्याची सोय उपलब्ध नसल्यास किमान ३डी-सीआरटी उपचार पध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दीड महिन्यापर्यंत चालते तसेच रेडीओथेरपी दरम्यान तोंडाला छाले येणे, गिळताना त्रास होणे, थुंकी येणे, तोंड कोरडे पडणे, चव बदलणे, इत्यादी त्रास होतात. हे सर्व त्रास टाळण्यासाठी तोंडाची निगा राखणे गुळण्या करणे तसेच पौष्टिक अन्न घेणे गरजेचे असते.

केमोथेरपीचे उपचार दर आठवड्याने रेडीओथेरपी सोबत किंवा दर तीन आठवड्याने दिले जातात. तसेच परत परत उदभवणाऱया रोगासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारच्या किमोथेरपीचे उपचार तसेच टार्गेट थेरपी उपयोगात आणली जाते.

शस्त्रक्रियेनंतर आवाजाचे पुनर्वसन :

शस्त्रक्रिया केल्यानंतर बोलता न येणे हा रुग्णासाठी मोठा मानसिक धक्का असतो. लिहून, मोबाईलद्वारे किंवा हातवारे करून सवांद साधता येतो. परंतु आपण आता बरीच प्रगती केली असून शस्त्रक्रिया करून स्वरयंत्र काढल्यानंतर देखील जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास बोलून सवांद साधने कठीण नाही. आवाजाचे पुनर्वसन करण्याकरिता खालील पध्दती वापरतात.

एसोफेगस स्पीच पध्दती, ट्रकीओ एसोफेगस पंचार पध्दती व इलेक्ट्रोल्यारीन्क्स पध्दती. इलेक्ट्रोल्यारीन्क्स उपकरण वापरण्यास सोपे असून शस्त्रक्रिया झालेल्या सर्वरुग्णांमध्ये उपयुक्त ठरते. या उपकरणातून यांत्रिक आवाज येतो तसेच ते महाग देखील आहे त्यामुळे म्हणावे लोकप्रिय झाले नाही.

या सर्व त्रासातून मुक्ती हवी असेल तर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणे बंद करावे.

डॉ. दिलीप निकम,

विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.

कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई

[email protected]

Updated : 5 May 2017 12:04 AM IST
Next Story
Share it
Top