घोडगंगा कारखाना गैरव्यवहाराची होणार चौकशी मात्र यामागे काय आहे भाजपाचा अजेंडा?
X
पुणे न्हावेर येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसला दणका देण्याची तयारी फडणवीस सरकारने केली आहे. कारण पुण्यातील घोडगंगा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत.
याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. घोडगंगा साखर कारखान्यावर कामगारांच्या नावावर कर्ज उचलल्याचा आरोप आहे. तसंच कारखान्याची पाच एकर जमीन खासगी संस्थेला दिल्याचाही ठपका कारखान्यावर आहे. या प्रकारामुळे सहकारी कारखाना तोट्यात असल्याचा आरोप उपोषणकर्ते संजय पाचंगे यांनी केलाय.
अशोक पवार हे घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन आहेत, मात्र अशोक पवार यांचे आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या व्यंकटेश कृपा साखर कारखान्याकडे जास्त लक्ष असल्याचा आरोप आहे.
कारखान्यातील भ्रष्टाचाराविरोधात शेतकरी संजय पाचंगे यांचे गेल्या दहा दिवसांपासून कारखान्याबाहेर उपोषण सुरु होते. या सर्व पार्श्वभूमीवर सहकार मंत्र्यांनी घोडगंगा साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.