Home > Top News > ...तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

...तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश

...तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
X

कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील कोरोना व्हायरस च्या रुग्णांची संख्या वाढण्याचा दर लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसपासून देशाला वाचविण्यासाठी पुढच्या २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

तर दुसरीकडे दुसरीकडे तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. तेलंगणा सरकारने संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंतही 'नाईट कर्फ्यू' लागू केला आहे. नागरिकांनी कर्फ्यूचे पालन केले नाही तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशाराच मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.

"कृपया घरीच रहा, नाहीतर सर्वांना याचे परिणाम भोगावे लागतील. परदेशातून जे नागरिक आले असतील आणि विलगीकरणाचे नियम पाळत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,"

राज्यातील पोलीस सर्वांना थांबवू शकत नाहीत. जर नागरिकांनी आदेश पाळले नाही तर लष्कराला पाचारण करण्यात येईल आणि दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिला आहे.

देशातील रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत देशात कोराना व्हायरस मुळे 11 लोकांना आपला जीव गमावला आहे. करोना व्हायरस मुळे तामिळनाडूत एका रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. करोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला असून देशातील करोनामुळे दगावणाऱ्यांचा आकडा ११वर पोहोचला आहे.

तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत करोनाच्या नवीन १८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका करोनाबाधित वृद्धाचा मृत्यू झाल्याने राज्यातील करोनाबळींची संख्या तीनवर पोहोचली.

या १८ रुग्णांमध्ये मुंबईतील सहा, इस्लामपूरमधील ४, पुण्यातील ३, साताऱ्यातील २ आणि अहमदनगर, कल्याण-डोंबिवली, ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार जगातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे.

१. जगभरात कोरोनाचे ३ लाख ७५ हजार ४९८ रुग्ण

२. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत १६ हजार ३३२ जणांचा मृत्यू

३. १९६ देशांमध्ये कोरोनाचै फैलाव

४. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण चीनमध्ये – ८१ हजार ६७६

५. कोरोनाबाधीता देशांच्या यादीत भारत ४१ व्या क्रमांकावर,भारतात कोरोनाचे ५१९ रुग्ण

Updated : 25 March 2020 9:46 AM IST
Next Story
Share it
Top