Sunny Deol | Pakistan | सनी देओलची पाकिस्तानमध्ये अजूनही दहशत
X
बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सनी देओलची (Sunny Deol) देहयष्टी पन्नाशी ओलांडल्यानंतरही रांगडीच आहे. चित्रपटाच्या नायकाला (Hero) शोभेल अशी प्रत्येक गोष्ट सनी देओलकडे अजूनही आहे. त्यामुळंच त्याच्या गदर २ (Gadar 2 ) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं ४० कोटी तर आठवडाभरात ३०० कोटी रूपयांचा टप्पाही ओलांडलाय. भारत विरूद्ध पाकिस्तान (India-Pakistan) असा विश्वचषकाचा (World cup) सामना यंदा भारतातच होतोय. त्याआधीच गदर २ वरून भारत विरूद्ध पाकिस्तान असा सांस्कृतिक सामना बघायला मिळतोय.
पाकिस्तानमध्ये (Pakistan) बॉलीवूड स्टार सलमान खान (salman khan) , अमीर खान (amir khan), रणबीर कपूर (ranbeer kapoor) यांचे चित्रपट जोरदार कमाई करतात. मात्र, सनी देओलचे चित्रपट पाकिस्तानच्या थिएटरमध्ये लावले जात नाहीत. एवढचं नाही तर सनी देओलला पाकिस्तानमध्ये येण्यास मनाई असल्याच्याही बातम्या येत असतात. पाकिस्तानमध्ये सनी देओलचे चित्रपट लागले तर प्रेक्षक तिथले चित्रपटगृहच पेटवून देतील, अशी भीती तिथल्या चित्रपटगृहाच्या मालकांना वाटतं असल्याच्याही बातम्या येत असतात. कारण सनी देओल यांनी बॉर्डर, माँ तुझे सलाम, द हिरो, गदर असे देशभक्तीपर चित्रपट दिलेले आहेत. त्यामुळं पाकिस्तानच्या चित्रपटगृहांमध्ये अजूनही सनी देओलच्या अभिनयाची दहशत कायम असल्याचं गदर २ च्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय.