माध्यमांचा आवाज दाबणे म्हणजे लोकशाहीच्या मूळ संकल्पनेलाच तडा- सुनिल तटकरे
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला प्रगल्भ अशी लोकशाही दिली. त्यामुळे या देशातील सर्वसामान्य माणसाला जो अधिकार मिळाला. तो अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार. याबरोबरच लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते. पण त्याला अधिकृत मान्यता नसल्याचे या ठिकाणी म्हटले गेले. परंतू लोकशाही स्थापन झाल्यापासून आतापर्यंत पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी मान्यता मिळाली आहे. मात्र लोकशाहीतील एका मोठ्या वैचारिक लढ्याला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असतो. त्यावेळी लोकशाहीच्या मूळ संकल्पनेला तडा जाईल की काय? अशी शक्यता निर्माण होत आहे. माच्क अशा वेळी लढाई बाण्याने उभं राहण्यासाठी तयार असावं. चिंतन करावं, असं मत खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.