ना कबुतर ना फोन, कुछ भी नहीं आया, काँग्रेसने ऑफर दिल्याच्या बातम्यांवर प्रकाश आंबेडकर यांचं भाष्य
X
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली होती. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीसोबत यावं, अशी भूमिका काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मांडली आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत यावं, अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना अशोक चव्हाण यांच्यामार्फत ऑफर दिली असून ते याबाबत सकारात्मक असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी ऑफरवर भाष्य केलं आहे.
अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली. वंचित बहूजन आघाडीला सोबत घेण्यासंदर्भात काँग्रेसची चर्चा सुरू आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर सकारात्मक असल्याचं ट्वीट शशी सिंग यांनी केलं होतं. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, ना कबुतर, ना फोन, कुछ भी नहीं आया.
तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही तर काँग्रेसची पेटंट असलेली मोडस ऑपरेंटी आहे. पत्रव्यवहार न करता लोकांना सांगत फिरतात.
महाविकास आघाडीशी संबंध नाही
प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझा संबंध उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. महाविकास आघाडीशी माझा संबंध नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसने ऑफर दिल्याने नवी चर्चा सुरु झाली होती. त्यावरही प्रकाश आंबेडकर यांनी पडदा टाकला आहे.