Home > Top News > शिवपुत्र संभाजी नाटक कसं होतं तेच बघतो, पोलिसाची अमोल कोल्हे यांना धमकी

शिवपुत्र संभाजी नाटक कसं होतं तेच बघतो, पोलिसाची अमोल कोल्हे यांना धमकी

शिवपुत्र संभाजी महानाट्य (Shivputra Sambhaji Mahanatya)दरम्यान खासदार अमोल कोल्हे(Amol Ramsing Kolhe) यांचे नाटक कसे होते तेच बघतो, अशी धमकी एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.

शिवपुत्र संभाजी नाटक कसं होतं तेच बघतो, पोलिसाची अमोल कोल्हे यांना धमकी
X

छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित खासदार(member of parliament)अमोल कोल्हे यांचे शिवपुत्र संभाजी महानाट्य महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत. याच नाटकाचे प्रयोग सध्या पिंपरी चिंचवड शहरातील एच ए मैदानात सुरू आहेत. संभाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी मी पाठीचं दुखणं असतानाही प्रयत्न करत असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितले. मात्र या प्रयत्नांना कुठेतरी अडथळा निर्माण करण्याचे काम पोलीस प्रशासनातील एका अंमलदाराने केले, असल्याचं अमोल कोल्हे यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत अमोल कोल्हे यांच्या नाटकाला बंदोबस्त पुरवण्यात आला होता. या बंदोबस्तातील एका पोलीस (police) अंमलदाराने नाटकातील आयोजकांना फ्री तिकिटांची मागणी केली. आयोजकांनी त्यांना नकार दिला असता 'हे नाटक कसे होते तेच बघतो मी' असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ह्या सर्व प्रकारामुळे अमोल कोल्हे यांनी मंचावरून आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला आहे.

पोलीसांच्या वर्दीबद्दल मला खूप प्रेम व आदर आहे. त्यामुळे मी स्वतःचा अंगरक्षक म्हणून देखील पोलिसांची मागणी करत नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे. या सर्व झालेल्या प्रकाराबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी पोलीसांना समज देण्यात यावी अशी देखील मागणी कोल्हे यांनी केली आहे. अंमलदारावर कारवाईची मागणी न करता फक्त समज देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Updated : 14 May 2023 12:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top