“मग कोरोना कशामुळे जाणार?” राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपली
X
अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर “सध्याच्या संकटाच्या काळात कशाला प्राधान्य द्यायचे याचा निर्णय जो तो घेत असतो.
राम मंदिर बांधून कोरोना जाणार असेल या भावनेने त्यांनी निर्णय घेतला असेल तर आपल्याला माहिती नाही”, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शऱद पवार यांनी टीका केली आहे. आमचे प्राधान्य कोरोना आटोक्यात आणण्याला आहे. तसंच कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून राज्याला कसे बाहेर काढायचे याला आमचे प्राधान्य आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
हे ही वाचा..
अयोध्या : रामलल्लाची मूर्ती हलवली राम मंदिरासाठी पहिलं पाऊल
आता राम मंदिराची तारीख सांगा!- उद्धव ठाकरे
आयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेकडून एक कोटीची देणगी
दरम्यान शरद पवार यांच्या या टीकेला भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी उत्तर दिले आहे. राम मंदिरामुळे कोरोना जाणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे, पण राम मंदिर हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धेचं राजकारण करु नये” अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राज्य़ सरकारने काय केले असा सवालही सुधीर मुनंगंटीवार यांनी विचारला आहे.