मुंबईचं ‘स्पिरीट’ ! कोरोना बाद ?
मुंबईच्या स्पिरिटमुळे कोरोना बाद झालाय का? संकट टळलंय का? दिलासा देणारा एक सर्व्हे आलाय. काय आहे सर्वे, वाचा......
X
कोरोनारील लस कधी येणार याची प्रतिक्षा संपूर्ण जग करत आहे. पण आता मुंबईतून एक अत्यंत दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या समूह प्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये सार्स-कोविड २ संसर्गाच्या अनुषंगाने, रक्त नमुने घेऊन सेरोलॉजिकल सर्वेलन्साचा उपक्रम नीती आयोग, बृहन्मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांनी संयुक्तरित्या सुरु केला होता. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून अभ्यास करताना कस्तुरबा रेणूजीवशास्त्र वैद्यकीय प्रयोगशाळा, ट्रांसलेशनल स्वास्थ्य विज्ञान एवं प्रौद्योगिकी संस्थान (Translational Health Science and Technology Institute), ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन आणि आय.डी.एफ.सी. इन्स्टिट्यूट हेदेखील त्यामध्ये सहयोगी संस्था म्हणून सहभागी होते.
भारतातील क्रॉस-सेक्शनल सर्वे म्हणून या अभ्यासाचे उद्दिष्ट नागरिकांच्या रक्तातील ऍन्टीेबॉडीजचे प्रमाण जाणून घेणे हे होते. त्यासाठी Random Sampling ने काही नमुने गोळा करण्यात आले होते. त्यात सर्वसाधारण लोकसंख्येचे वय आणि लिंग यातील स्तरानुसार तसेच आरोग्य कर्मचारी यांचे नमुने घेऊन या साथ आजाराचा फैलाव कसा झाला, त्याचा अभ्यामस करण्याघसाठी दोन टप्प्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.
पहिल्या फेरीमध्ये ठरलेल्या ८ हजार ८७० पैकी एकूण ६ हजार ९३६ नमुने गोळा करण्यात आले. झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी परिसर मिळून आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर या ३ विभागांमध्ये सर्वसाधारण लोकसंख्येतून हे नमुने गोळा करण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींच्या परवानगीनंतर त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये अबॉट कंपनीच्या क्लिया पद्धतीचा उपयोग करून अँटी सार्सकोविड आयजीजी ॲण्टीबॉडीजची पडताळणी करण्यात आली.
सर्वेक्षणातील निष्कर्ष
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरात दिवसातील १२ ते १४ दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये ठरवण्यात आलेल्या लक्ष्यापैकी झोपडपट्टी भागातून १०० टक्के तर बिगर झोपडपट्टी भागातून सरासरी ७० टक्के प्रतिनिधी सहभागी झाले होते.
१) संबंधित तीन विभागांमध्ये केलेल्या शास्त्रशुद्ध अभ्यासातून असे निदर्शनास आले आहे की, झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १६ टक्के याप्रमाणे या रक्ताधतील प्रतिद्रव्य७ (ऍन्टीपबॉडीज) चे प्रमाण आढळून आले आहे.
२) ऍन्टी्बॉडीजचे प्रमाण महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले असले तरी या तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये प्रमाण समान असल्याचे आढळले आहे.
निष्कर्षांचा अर्थ
• एकूण संसर्गाच्या प्रमाणापैकी लक्षणे नसलेल्या बाधितांचे (असिम्प्टोमॅटिक) प्रमाण हे जास्त असू शकते.
• झोपडपट्टी परिसरांमध्ये जास्त प्राबल्य आढळून येण्याचे कारण लोकसंख्येची घनता आणि सामुदायिक सुविधा (जसे की- शौचालये, पाण्याची भरण्याची सार्वजनिक ठिकाणे) वापरणे हे देखील असू शकते.
• याठिकाणी सध्याचे प्राबल्य (अंदाजित) आणि महानगरपालिकेकडे नोंद असलेली मृत्यू प्रकरणे यांचा एकत्रित विचार केला असता, संसर्ग मृत्यू दर (Infection Fatality Rate-IFR) हा अतिशय कमी (०.०५-०.१०%) असण्याची शक्यता आहे. संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेले प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय व लक्षणे दिसत असलेल्या बाधितांना (Symptomatic) विलगीकरण करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यामुळे देखील हे शक्य झाले.
• बिगर झोपडपट्टी भागांमध्ये तुलनेने अधिक चांगले असलेले सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेमुळे आणि त्या सोबतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे देखील प्राबल्य कमी आढळले आहे.
• सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्यूनिटी) संदर्भात अधिक अभ्यास करण्यासाठी हे संशोधन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.. सामूहिक प्रतिरोधक शक्ती तयार होण्यासाठी कुठल्या पातळीपर्यंत प्राबल्य असले पाहिजे, हे अद्यापही अनिश्चित असले तरी, हे निष्कर्ष दर्शवतात की, जर लोकसंख्येच्या मोठ्या हिश्श्यामध्ये प्रतिरोधक शक्ती अस्तित्वात असेल आणि टिकून असेल तर निदान झोपडपट्ट्यांमध्ये तरी लवकरच हे कळून येईल.
सारांश रुपात, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेल्या नोंदींच्या आधारे, सर्वेक्षण केलेल्या तीनही विभागांमध्ये रुग्णांचे मृत्यू दर (case fatality rate) (सुमारे ५-६ टक्के) याच्या तुलनेत संसर्ग मृत्यू दर (Infection Fatality Rate-IFR) हा कमी (०.०५-०.१०%) असू शकते.
एकूणच, संसर्गाच्या फैलावाचा वेग कमी होण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे आणि मास्क लावणे इत्यादी उपाययोजना प्रभावी आहेत. त्यामुळे या उपाययोजना समाजाच्या सर्व स्तरांमध्ये नवीन नित्याच्या बाबी म्हणून स्वीकारल्या गेल्या पाहिजेत.
या अभ्यास किंवा विश्लेषणातून न्यूट्रलायझिंग ऍन्टी.बॉडीज आणि सार्स कोविड २ संसर्गातील धोक्याचे घटक याबाबतची माहिती मिळू शकले. सर्वेक्षणाच्या पुढच्या फेऱ्यांमधून झोपडपट्टी आणि बिगर झोपडपट्टी भागांमधील संसर्गाच्या फैलावाची माहिती मिळू शकेल. तसेच सामूहिक प्रतिरोधक शक्ती (हर्ड इम्युनिटी) बाबतदेखील स्थिती कळू शकेल.