Home > Top News > Max Maharashtra impact : मॅक्स महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांनी केली दिव्यांग कल्याण विभागाची घोषणा

Max Maharashtra impact : मॅक्स महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांनी केली दिव्यांग कल्याण विभागाची घोषणा

दिव्यांगांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने सातत्याने भूमिका घेतली होती. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दिव्यांगांना येणाऱ्या अडचणींवर मॅक्स महाराष्ट्रने प्रकाश टाकला होता. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी दिव्यांग कल्याण विभागाची घोषणा केली.

Max Maharashtra impact :  मॅक्स महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश, मुख्यमंत्र्यांनी केली दिव्यांग कल्याण विभागाची घोषणा
X

दिव्यांगांना दररोजच्या जगण्यात अनेक समस्या येत असतात. त्या सोडवण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत वसतिगृह चालवली जातात. या वस्तीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या धर्तीवर मदत मिळावी, या मागणीचा पाठपुरावा मॅक्स महाराष्ट्रने बच्चू कडू यांच्याकडे केला होता. याबरोबरच गरीबाच्या मुलांनी शिकायचं नाही का? या आशयाचे वृत्त प्रकाशित करत पाठपुरावा केला. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेणार असल्याचं मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना सांगितलं होतं. अखेर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत.

काय आहेत निर्णय?

  • गाव-खेड्यांमधील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन किंवा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार. त्याबरोबरच सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि स्थानिक आमदार निधी यांच्या अर्थसहाय्याने हे दिव्यांग भवन बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असून ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी करण्यात येईल, त्यासाठी विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
  • अकोला आणि ठाण्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांची माहिती संकलित होऊन त्यांना योजनांचा लाभ देणे सुलभ होणार
  • एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करीत असताना दिव्यांगांसाठी दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. तसेच दिव्यांगांसोबतच्या व्यक्तींना बस प्रवासात देण्यात येणाऱ्या ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
  • खाजगी क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीने दिव्यांगांसाठी योग्य नोकऱ्यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देतानाच वसतीगृहात निवासाची सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्याच्या सूचनाही दिल्या.
  • ग्रामीण भागात ज्या दिव्यांगांच्या घरी शौचालयाची सुविधा नसेल. तिथे शौचालय बांधण्यासाठी ग्रामविकास विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याच्या प्रस्तावावर मुख्य सचिवांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Updated : 10 Nov 2022 2:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top