Home > Top News > लोकं जगली नाही तर सरकार काय कामाचे :संजय राऊत

लोकं जगली नाही तर सरकार काय कामाचे :संजय राऊत

राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असताना राज्य सरकारने निर्बंध जारी केले आहेत. विरोधी पक्षाने सुरुवातीला सहकार्याची भूमिका घेतली असताना आता व्यापारी लॉकडाऊनला विरोध करत आहेत. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्यापाऱ्यांच्या भूमी त्याला पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लॉकडाऊन हे लोकांच्या हितासाठी आहे. ही लोकं जगली नाही तर सरकार काय कामाचे? असा सवाल उपस्थित केला आहे.

लोकं जगली नाही तर सरकार काय कामाचे :संजय राऊत
X


सरकारने अंशतः लॉकडाऊन जाहीर केले आणि प्रत्यक्षात 'ब्रेक द चेन' च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू केल्याचा आरोप करीत राज्यात ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांची दिशाभूल केली आहे. २५ दिवस दुकाने बंद ठेऊन कसे जगायचे असा संतप्त प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. हा 'ब्रेक द चेन' व्यावसायिकासाठी 'ब्रेक द लाईफ' ठरू शकतो, अशाही प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख विरोधी पक्षाची चर्चा करूनच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. आता विरोध झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे सूचवले आहे.यासंदर्भात, खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोविडविरुद्धची लढाई लढायला हवी.राजकारण करण्यासाठी उभा जन्म आपल्याकडं आहे. सरकार येतं आणि सरकार जातंही, पण जे लोकं सरकार निवडून देतात, तीच जगली नाही, तर राज्य आणि सरकार काय कामाचं. सरकाराने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. गुजरात हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहे, तेथे उच्च न्यायालयाने लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरुन, जर लॉकडाऊन केलं नाही तर परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेचं हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केला आहे.

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी. तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. केवळ दोन दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. मात्र, इतरही 5 दिवस लॉकडाऊनसदृश्य परिस्थितीचे कडक निर्बंध असल्याने जनमानसात कमालीची अस्वस्था आहे. त्यामुळे या निर्बंधाची नव्याने अधिसूचना जारी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.

Updated : 7 April 2021 2:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top