Home > Top News > टोमणा मारूनही आनंद महिंद्रा यांनी का मानले उद्धव ठाकरेंचे आभार?

टोमणा मारूनही आनंद महिंद्रा यांनी का मानले उद्धव ठाकरेंचे आभार?

वाढत्या कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन नको म्हणणाऱ्या उद्योजकांनी आता यू टर्न घेतला असून, कडक लॉकडाऊन न लावता फक्त निर्बंध घातल्याने उद्योजक आनंद महिंद्रा यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.केवळ फर्निचरचे दुकान म्हणजे हॉस्पिटल नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आनंद महिंद्रा यांची लॉकडाऊन वरून कानउघडणी केली होती.

टोमणा मारूनही आनंद महिंद्रा यांनी का मानले उद्धव ठाकरेंचे आभार?
X

सर्वत्र कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वायू वेगाने वाढत असताना महाराष्ट्रात काल पासून कडक निर्बंध लागू झाले आहेत.कोरोनाचे नियंत्रण करा परंतु लॉकडाउन नको, अशी भूमिका प्रमुख उद्योजक आणि विरोधी पक्षांनी घेतली होती. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पन्नास हजारापेक्षा जास्त वाढल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकारी प्रमुख विरोधी पक्ष उद्योजक संघटना आणि विविध प्रतिनिधींच्या संघटनांशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या मंजुरी कडक लॉकडाऊन न करता केवळ निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता.

कालपासून हे निर्बंध राज्यभर लागू झाले असून आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवार संपूर्ण विकेंड लॉकडाऊन देखील लागू करण्यात येणार आहेत. महिंद्रा चे मालक आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाउनला विरोध केला होता.. 'उद्धवजी, अडचण अशी आहे की लॉकडाऊनमुळं फटका बसणाऱ्यांमध्ये सर्वाधिक गरीब, स्थलांतरित मजूर आणि लघु उद्योजक आहेत. मूळ लॉकडाऊन मूलत: रुग्णालयं / आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी करण्यासाठी होतं. त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया', असं त्यांनी ट्विट केलं होतं.

त्यावर फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंधांचे सुतोवाच केले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,मी त्यांचे नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितले की, लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितले, त्यांना मी हात जोडून सांगू इच्छितो, की आरोग्य सुविधा आपण वाढवतोच. पण कृपा करुन रोज मला किमान 50 डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांचा महाराष्ट्रात पुरवठा होईल, अशी काहीतरी सोय करा. कारण केवळ फर्निचरचे दुकान म्हणजे हॉस्पिटल नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांसह नाव न घेता उद्योगपती आनंद महिंद्रा यांना चांगलेच सुनावले. मी लॉकडाऊन लावत नाही, तुम्ही वाढणाऱ्या कोरोना रुग्णवाढीवर उपास सांगणार का, असा थेट सवाल केला होता.या टीकेनंतर आनंद महिंद्रा यांनी कुठेही प्रत्युत्तर दिले नव्हते परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आनंद महिंद्रा यांची बाजू उचलून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती.आता कडक निर्बंध लागू झाल्यानंतर आश्चर्यकारकरित्या आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाऊन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे. लॉकडाऊन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय. सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहते. आता या करोनासंबंधित नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे, जेणेकरुन ही बंधने लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील.




Updated : 6 April 2021 2:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top