बावनदीला पूर, पूल गेला वाहुन - निवधे गाव चा संपर्क तूटला.
heavy rain in Konkon
X
कोकणात पावसाच्या अतिवृष्टीमुळे संगमेश्वर तालुक्यातील बावनदीचा पुल वाहुन गेल्याने निवधे गाव चा संपर्क तूटला आहे. कोणती ही जिवितहानी नसून गावकऱ्यांच्या समक्ष पूल वाहून गेल्याच सांगीतल जात आहे.
शहराच्या ठिकाणी वरदळीचा मुख्य पूल असून देवरुख, मार्लेश्वर बामणोली,ओझरे,मारळ, अंगावली या ठिकाणी जाण्याचा एकमेव मार्ग आहे. तसेच नदीकाठी असणारी शेती पाण्याखाली गेली आहे.तर शाळकरी मुल, व्यावसायीक, यांचे अतोनात नुकसानान होणार आहे. त्यातच कोरोनाचा थैमान असल्याने आरोग्य विषस गांभीर्याचा बनला आहे.
25 ते 30 वर्षा पूर्वी बांधण्यात आलेला हा पूल अतिशय धक्कादायक बनला होता. अनेदा ग्रामस्थांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. अध्याप त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. गेले अनेक वर्षे गावातील ग्रामस्थ नवीन पूल व्हावा यासाठी पाठपुरावा देखील करत होते, पूल मंजूर असल्याच आमदार शेखर निकम यांनी सांगीतल आहे. पण ते आजून कागदोपत्री असल्याच सांगत आहेत. याची दखल ना शासन घेत ना प्रशासन?
ग्रामस्थ रविंद्र गुरव सांगतात की हा ६० मि. लोखंडी सांकव होता. आमदार शेखत निकम यांनी स्वखर्चातून. दोन वेळा डाकडूजी केली होती. पाण्याची पातळी वाढल्यामुळे वाहून गेला आहे. तर आता आमची गैर सोय होत आहे.
पुलावरून रहदारी चालू असते गावातील लोक व मार्लेश्वर करिता चालत येणार भावीक हे या पुलाचा वापर करत असतात 25 ते 30 वर्षा पूर्वी बांधण्यात आलेला हा पूल अतिशय धक्कादायक बनलेला होता.परंतू हा पूल वाहूल गेल्यानंतर तरी. प्रशासनाने जागे व्हावे आणि लवकरात लवकर आमची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी निवधे ग्रामस्थ करत आहेत.