Home > गोष्ट पैशांची > तुम्ही SBI चं ATM वापरत आहात का? 1 जानेवारी पासून बदणार पैसे काढण्याचे नियम !
तुम्ही SBI चं ATM वापरत आहात का? 1 जानेवारी पासून बदणार पैसे काढण्याचे नियम !
Max Maharashtra | 27 Dec 2019 8:59 PM IST
X
X
जर तुम्ही भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियाचं (SBI) एटीएम कार्ड (ATM) वापरात असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एसबीआय़ ने 1 जानेवारी पासून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. 22 हजार शाखा असलेल्या एसबीआयचे देशात 40 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळं या 40 कोटी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
भारतीय स्टेट बॅंक (SBI) चं ATM कार्ड वापरणाऱ्य़ा ग्राहकांना 1 जानेवारी पासून वन टाइम पासवर्ड (OTP) चा उपयोग करुन पैसे काढावे लागणार आहे. या सुविधेमुळे ग्राहकांच्या पैशाची सुरक्षितता वाढणार असून सीमकार्ड क्लोन सारख्या घटनांना आळा बसणार आहे.
जेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनला सूचना कराल. तेव्हा तुमच्या रजिस्टर मोबाईल वर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल. जेव्हा तुम्ही तुम्हाला हवी असलेली रक्कम एटीएम वर टाकाल तेव्हा तुम्हाला हा ओटीपी मिळणार आहे.
ही सुविधा फक्त एसबीआयच्या एटीएमवर सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंतच उपलब्ध असणार आहे. ही सुविधा 10 हजार पेक्षा जास्त रकमेसाठी असणार आहे.
Updated : 27 Dec 2019 8:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire