प्रकाश आंबेडकरांसोबतच्या युतीवर युवराज संभाजीराजे छत्रपती स्पष्टच बोलले
X
काही दिवसांपूर्वी युवराज संभाजीराजे छत्रपती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते यांच्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं दीर्घ बैठक झाली होती. त्याचवेळी छत्रपती घराणं आणि आंबेडकर घराणं एकत्र आलं तर राज्यात राजकीय परिवर्तन होऊ शकेल, अशी शक्यता दोघांनीही एकत्रित वर्तवली होती. मात्र, त्यात आता ट्विस्ट निर्माण झालाय. कारण प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला होता. त्याचे पडसादही राजकीय वर्तुळात उमटले. यावर आता युवराज संभाजीराजे छत्रपती यांनीही आपली भुमिका स्पष्ट केलीय. ते म्हणाले, “ प्रकाश आंबेडकर यांच्या त्या कृतीचं समर्थन कसं करणार ? प्रकाशा आंबेडकरांसोबत जाणार नाही. मी माझी भुमिका स्पष्ट केल्याचं ते म्हणाले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करताना औरंगजेबानं ठार मारण्याचा प्रयत्न केला. ज्याने संभाजी महाराजांची हत्या केली. ज्या तारारणींनी सात वर्षे लढा दिला अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची गरज काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अभिवादनच करायचं असेल तर शिवाजी महाराजांच्या समाधीला जाऊन करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाडला गेल्यावर न चुकता ते रायगडावर गेले आणि त्यांनी समाधीला अभिवादन केल्याची आठवणही यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती यानी सांगितली.